कोल्हापूर दि . २७ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
श्री .क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरावरील काळभैरव मंदिरात काळभैरव जन्मकाळ सोहळा चांगभलं च्या जयघोषात मोठया धार्मिक उत्साहात पार पडला .काळभैरवाची पारंपारीक भैरवं रूपात पूजा तर जोतिबाची चतूर्भूज रूपात महापूजा बांधण्यात आली होती .
शनिवारी मंदिरात पहाटे ४ वाजता घंटानाद करून ४ते ५ पाद्य पूजा काकड आरती लघु रुद्र अभिषेक पोषाख व अलंकार महापूजा १०ते१ पुण्य हवाचन , मातृकापूजन ‘ नवग्रह पुजन ,क्षेत्रपाल पुजन , होमहवन झाले . पुरोहीत यांनी मंत्र पठण केले. दुपारी २ते ५ला ज्योतिर्लिंग भजनी मंडळ ‘डवरी गीते कार्यक्रम झाला . सांय .६ वा .श्री काळभैरव जन्म काळ सोहळा मंदिरात पार पडला.श्रीं चे मुख्य पुजारी , समस्त गावकर ,खंडकरी तुषार झुगर , सरपंच राधा बुणे यांच्या प्रमूख उपस्थितीत उपस्थितीत काळभैरव जन्मकाळ सोहळा संपन झाला . महिलांनी पाळणा गीत म्हटले .भाविकांनी ‘ गुलाल, फुलांची उधळण केली . काळभैरवाची पारंपारिक भैरवं रूपात उत्सव पुजा बांधण्यात आली होती . ही पुजा केदार शिंगे , प्रणव सांगळे ,चैतन्य बुणे , निवास मिटके ,सागर लादे यांनी बांधली .जोतिबाची चतूर्भूज रूपातपूजा बांधण्यात आली होती. काळभैरव नावानं चांगभलं चा गजर करत सूंटवडा वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करून सोहळ्याची सांगता झाली . भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला . मंदिराची रंगरंगोटी , सभा मंडप ‘ विद्युत रोषणाई करण्यात आली होती . रात्री भक्ती गीताचा कार्यक्रम झाला . जोतिबा डोंगरावर भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







