डोंगरगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम
डोंगरगाव (प्रतिनिधी)
दिनांक 23 जून 2021 रोजी डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र भगवान पाटील यांच्या शेतावर शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्या उपस्थितीत व धुळे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला
दिनांक 21 जून ते 1जुलै 2021 पर्यंत शासनाच्या बी बीएफ योजनेअंतर्गत पेरणी करणे ,विकेल ते पिकेल, मधु मका बीज माहिती, कापूस व मका पिकावरील गुलाबी बोंड आळी व तिचे नियंत्रण, खत व्यवस्थापन इत्यादीवर तालुका कृषी अधिकारी बोरसे यांनी सखोल माहिती दिली या दिवशी डॉ पंकज पाटील कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ धुळे, एन एन साबळे मंडळ कृषी अधिकारी, बीए पाटील कृषी पर्यवेक्षक, स्मिता पानपाटील कृषी सहाय्यक, सुकन्या वाघ कृषी सहाय्यक ,एच वाय काकुस्ते कृषी सहाय्यक इत्यादी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, एस ए पाटील ,अशोक पाटील, शालिग्राम देवराम पाटील, हिम्मतराव पाटील ,मधुकर आसाराम पाटील ,भगवान नथू पाटील ,पितांबर गोविंदा पाटील ,निंबा गना पाटील, प्रभाकर आसाराम पाटील, ज्ञानेश्वर अर्जुन पाटील, ईश्वर किरण पाटील, विजय रामभाऊ पाटील, मिलिंद धनराज पाटील, धनराज भगवान पाटील, राजेंद्र भगवान पाटील, आर आर पाटील ,अनिल मोतीराम निकम, अरुण दिलीप पाटील, देविदास रूपचंद पाटील, रंगराव गोविंदा पाटील ,विनोद देविदास पाटील, शिवाजी मोतीराम पाटील व बहुसंख्य शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते