कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन
पारेकरवाडी ता.आटपाडी येथे कृषी संजीवनी मोहिम 2021 22 अंतर्गत कार्यक्रम संपन्न झाला.तालुका कृषी अधिकारी कार्यालय आटपाडी यांच्यावतीने पारेकरवाडी येथे कृषी संजीवनी मोहीम पार पडली या मोहिमेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन वाढविणे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच जमिनीचे मृदाआरोग्य तपासणी कृषी यांत्रिकीकरण, ठिबक व तुषार सिंचन, प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्यो,ग बीबीएफ तंत्रज्ञान ,बीज प्रक्रिया, मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी नियंत्रण सेंद्रिय खताचा वापर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सलग क्षेत्रावरील फळबाग लागवड व बांधावरील फळबाग लागवड, गांडूळ खत युनिट, कंपोस्ट खत युनिट, अस्तरीकरणासाठी शेततळे, विकेल ते पिकेल याची सविस्तर माहिती सांगण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी अधिक माने, धनंजय वाघमारे, विकास पाटील, लालासाहेब डोंबाळे ,अधिक डोंबाळे, सत्यवान बरकडे ,राजाराम खर्जे अर्जुन करडे तसेच मंडळ कृषी अधिकारी एस बी लोखंडे,पर्यवेक्षक के .एस. घोडके, कृषी सहाय्यक रामदास ढवळे, संजय काळेल, सागर ठोंबरे व शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी पी. पी .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला