कामथ येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत बीज प्रक्रिया मोहीम .
कमथ ता.आटपाडी येथे कृषी संजीवनी मोहीम 2021 अंतर्गत खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी बीज प्रक्रिया मोहीम अंतर्गत प्रमुख पिके बाजरी, मका बियाणास पेरणीपूर्वी जैविक बीज प्रक्रिया केली. उदा. ऍझोटोबॅक्टर, पी .एस .बी. या जिवाणू संवर्धनाची प्रति किलो बियानास सहा मिली याप्रमाणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले.
बीजप्रक्रियेमुळे पिकांची वाढ निरोगी व सुदृढ होते, जमिनीतून बुरशीजन्य रोगाचा व किडींचा प्रादुर्भाव बीजप्रक्रियेमुळे कमी होतो. त्याच बरोबर जमिनीमध्ये असणाऱ्या खतांचा वापर पिकास उपलब्ध करून दिला जातो, दहा टक्के रासायनिक खतांचा वापर कमी होतो, पिकाचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न जास्त मिळते. कृषि सहाय्यक रविंद्र घुटूकडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषि पर्यवेक्षक प्रदिप चोरूमले यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी सरपंच परशुराम सरक यांनी पुर्व नियोजनाने व अभ्यासपूर्वक शेती करणे काळाची गरज आहे असे म्हणाले .त्यांनी कृषि विभागाचे कामाबद्दल समाधान व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.