आता माघार नाही; ओबीसींच्या हक्कासाठी २६ जून रोजी जिल्ह्यात चक्काजाम
विलास काळेबाग-जिल्हाध्यक्ष (भाजपा ओबीसी मोर्चा सांगली )
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींमध्ये अत्यंत संतप्त भावना आहेत. आरक्षणाचं हे न्यायालयीन पातळीवर लढले जात असताना केवळ राज्य सरकारने प्रभावी बाजू न मांडल्याने आणि केवळ वेळकाढूपणा केल्यामुळे हे आरक्षण गेले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक आज विरोधीपक्ष नेते . देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पडली. यामध्ये सर्वांगीण चर्चेनंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडू आणि आवश्यकतेनुसार न्यायालयात जाऊ, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
मुंबईमध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये चक्काजाम करणार असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिनांक 26 रोजी चक्काजाम आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे असे आवाहन केले आहे.
मुंबई मध्ये झालेल्या बैठकीला ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष .योगेशजी टिळेकर, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, चंद्रशेखरजी बावनकुळे, . गिरीशजी महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजयजी कुटे, मनिषाताई चौधरी, आ.जयकुमार गोरे, चित्राताई वाघ आणि अन्य सहकारी उपस्थित होते.