• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

27 लाख रुपये खर्च करुन प्रकाशमय झालेला ‘तोरणा गड’ काही दिवसातच अंधारात ,वनविभागाचा भोंगळ कारभार…..

माणगंगा by माणगंगा
December 22, 2021
in पुणे
0
27 लाख रुपये खर्च करुन प्रकाशमय झालेला ‘तोरणा गड’ काही दिवसातच अंधारात ,वनविभागाचा भोंगळ कारभार…..

सत्तावीस लाख रुपये खर्च करुन प्रकाशमय झालेला ‘तोरणा गड’ काही दिवसातच अंधारात ,वनविभागाचा भोंगळ कारभार आला समोर

पुणे येथील दत्ताञय फडतरे यांचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना निवेदन

पुणे (प्रतिनीधी )

महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून काही दिवसांपूर्वी तोरणा गडावर वीज आली आणि गड प्रकाशमान झाला. मात्र काही दिवसांतच शासनाच्या वन विभागाला तोरणागडावर गेलेल्या विजेचे खांब वन विभागाच्या हद्दीतून गेल्याने वन विभागाने महावितरणने पूर्ण केलेल्या या कामावर आक्षेप घेतल्याने प्रकाशमय झालेल्या तोरणागडावर पुन्हा अंधार झाला आहे. उदघाटनानंतर काही दिवसांनी आक्षेप घेतल्यामुळे यानिमित्त वनविभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे , वरिल प्रकरणात सबंधित खात्याशी समन्वय साधुन तातडीने निर्णय घेण्याची पुणे येथील दत्ताञय फडतरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांकडे निवेदनादवारे केली आहे .

किल्ले तोरणा स्वराज्याचे पाहिले तोरण, किल्ले तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे ,लाखो शिवप्रेमींचे श्रध्दास्थान या किल्ल्यावर शिवप्रेमी व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. गडावर जाणारा मार्ग व किल्ला प्रकाशमान होण्यासाठी अनेक शिवप्रेमींची मागणी होती ,त्यानुसार दोन वर्षांपूर्वी गड विद्युतीकरणासाठी निधी मंजूर झाला होता.नोव्हेंबर महिन्यापर्यंत तोरणागड अंधारात होता या विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून २७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता या कामामध्ये ११ केव्हीच्या वाहिनीसाठी २७ विजेचे खांब तर लघुदाब वाहिनीसाठी २० खांब उभारण्यात आले. तर १८०० मीटर लांबीची भूमिगत विजवाहिनी दर्याखोऱ्यातून टाकण्यात आली आहे. तर १०० केव्हिए क्षमतेचे रोहित्र उभारून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी घाटमाथ्यावर डोंगरदऱ्या तुन खांद्यावर विजेचे खांब व इतर साहित्याची वाहतूक केली होती.

काम पूर्ण झाले, दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वेल्हे दौऱ्यावर असताना मंगळवार ता.३० नोव्हेंबर २०२१ रोजी गडावरील विद्युतीकरणाचे उद्घाटन करण्यात आले होते व तोरणागड प्रकाशमान झाला . यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालकासहीत सर्व अधिकारी उपस्थित होते .परंतु असे असताना वनविभागास उदघाटनानंतर काही दिवसांनी उपरती झाली असून हा विजेचा पुरवठा झालेल्या काही भागामध्ये वनविभागाची हद्द असल्याचे उशिरा निदर्शनास आले व कामावर हरकत घेत यांनी सदरचा विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या.महावितरण व वनविभाग यांच्यात ताळमेळ नसल्याने सदर परिस्थिती ओढावली असल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त होत आहे . गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी दिवा पेटला नसून किल्ले तोरणा अंधारात आहे. वरिल प्रकरणात लक्ष घालुन समन्वयादवारे परवानगीचा आदेश देवुन तोरणा गड पुन्हा प्रकाशमय करण्याची मागणी फडतरे यांनी निवेदनादवारे राज्यशासनाकडे केली आहे.

Views: 804
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
२३ डिसेंबर – राष्ट्रीय शेतकरी दिन

२३ डिसेंबर - राष्ट्रीय शेतकरी दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)