बिग बॉस मराठी सिझन 3 च्या विजेत्याची गेल्या रविवारी निवड झाली . या मध्ये जोतिबा मालिकेतील जोतिबा देवाची भूमिका साकारणारा विशाल निकमची विजेता म्हणून निवड झाली निवड होताच ” जोतिबा च्या नावानं चांगभलं असा गजर करून बिग बॉस च्या स्टेजवर विजेते पदक घेतले होते . आज परत एखदा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जोतिबा च्या मंदिर आवारात येऊन चांगभलंचा गजर करीत गुलालाची उधळण केली . पारंपारिक पद्धतीने मनोभावे जोतिबाचे दर्शन घेतले .







