अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे व्याख्यान
विद्या प्रसारक मंडळ संचालीत अमोलकचंद लॉ काॕलेज मधे आॕनलाईन व्याख्यानमाला सातत्याने सुरू असते, त्याच अनुषंगाने तुरुंगाधिकारी यवतमाळ श्रीमती किर्ती चिंतामणी यांचे “तुरूंग प्रशासकीय व्यवस्था” यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.
श्रीमती किर्ती चिंतामणी यांनी तुरूंग व्यवस्थेत अधिकारी -कर्मचारी यांची कर्तव्ये तसेच बंदीना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यांच्या दैनंदिन कामकाजाची पद्धत , पॕरोल,फरलो आदी बाबींवर मार्गदर्शन केले. कारागृहाऐवजी सुधारगृह हि शासनाची संकल्पना असुन बंद्याना गुन्हेगारीपासुन दूर करून समाजातील मुख्य प्रवाहात सामिल करण्याचे ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासाठी खुले कारागृह, तसेच कुशल कामगार तयार करण्याचे कार्य सगळीकडे सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
डॉ. संदीप नगराळे ह्यांनी ह्यांनी प्रास्तविक , संचालन व आभार मानले.
यावेळी डॉ. विजेश मुणोत, प्रा. छाया पोटे, प्रा. वैशाली फाळे , प्रा. स्वप्नील सगणे ई. शिक्षकांची तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.