दिघंची विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी हनमंतराव देशमुख यांची बिनविरोध निवड
दिघंची विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी हणमंतराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सुभाष नामदेव मोरे यांची निवड करण्यात आली
सर्वात मोठी असणाऱ्या या संस्थेला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत या सोसायटीची निवड बिनविरोध पार पडली सोसायटीच्या माध्यमातून आता पर्यंत 13 कोटीचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. दिघंची सह राजेवाडी, उंबरगाव, विटलापूर, पुजारवाडी, पांढरेवाडी, पळसखेल आदी गावातील शेतकऱ्यांना या विकास सोसायटीच्या माध्यमातून कर्ज पुरवठा.
दिघंची विविध कार्यकारी सह.सोसायटीची निवडणूक बिनविरोध !
आटपाडी तालुक्यातील एक अग्रगण्य व शेतकऱ्यांच्या विकासात मोलाचे योगदान देणारी म्हणून दिघंची विकास सोसायटीची जिल्हाभर ओळख आहे.याची आज निवडणूक बिनविरोध पार पडल्याने काम करण्याची व तिचा नावलौकिक वाढविण्याची संचालक मंडळाची जबाबदारी आणखी वाढली आहे.
दिघंची पंचक्रोशीतील लोकनेते कै.धोंडीसाहेब बापूसाहेब देशमुख यांच्या विचाराने चालणारी ही संस्था भविष्यात शेतकरी हिताचे अनेक चांगले निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक चांगले उंचावेल व शेतकरी हिताला राजकारण विरहित प्राधान्य देणेत येइल असे नूतन चेअरमन हणमंतराव देशमूख यांनी यावेळी मत व्यक्त केले.
या प्रसंगी निवडणूक अधिकारी विकास जाधव साहेब,संस्थेचे सचिव दादासाहेब काळे तसेच नवनिर्वाचित संचालक हणमंतराव देशमुख,रावसाहेब ढोले, सुभाष मोरे पाटील व इतर सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
या प्रसंगी दिघंची लोकनेते कै.धोंडीसाहेब देशमुख यांच्या विचाराने चालणारी ही संस्था भविष्यात शेतकरी हिताचे अनेक चांगले निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक चांगले उंचावेल व शेतकरी हिताला राजकारण विरहित प्राधान्य देणेत येइल असे यावेळी हणमंत देशमुख म्हणाले










