• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मायणी गटात शेतकऱ्यांसाठी धावली “शिवसेना”विशाल चव्हाण यांनी घेतला हाती “भगवा”

माणगंगा by माणगंगा
January 9, 2022
in सांगली
0
मायणी गटात शेतकऱ्यांसाठी धावली “शिवसेना”विशाल चव्हाण यांनी घेतला हाती “भगवा”

मायणी गटात शेतकऱ्यांसाठी धावली “शिवसेना”
विशाल चव्हाण यांनी घेतला हाती “भगवा”

मायणी :- सतीश डोंगरे


कोरोना,अवकाळी पाऊस,बाजारात नसलेला शेतीमालाला दर यामुळे पिचलेला शेतकरी ,यातच भर म्हणून वीज कंपनीने विजबिलापोटी ऐन पिकाच्या हंगामात लाईट कनेक्शन तोडण्याचा घाट घातल्याने भागातील शेतकरी अडचणीत आला होता.यावेळी मायणी गटातील शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आल्याने महिनाभरापासून खंडित झालेला शेतीपंपाचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने तातडीने सुरळीत केल्याने मायणी जि प गटातील शेतकऱ्यांनी शिवसेनेचे मायणी गट प्रमुख विशाल चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

      सध्या सर्वत्र कोरोना काळ आणि गावातील वीज वितरण कंपनीचा बोलबाला  सुरू आहे. याचे कारण,कोरोनाचा नवीन संक्रमण व्हायरसामुळे सर्वत्र भीतीने वातावरण पसरले आहे . तर मायणी परिसराबरोबरच सर्वत्र शेतीपंपाच्या लाईट बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीज वितरण कंपनीने कनेक्शन तोडण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

        अगोदरच प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक घटना घडल्याने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांकडून एकमेकांवर होणारा आरोपप्रत्यारोप सर्व जनतेने पहिला आहे. 
        विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीला पाहून प्रेरित होऊन शिवसेनेची वाट धरलेले मायणी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांच्यावर महाराष्ट्राचे गुहराज्यमंत्री ना.शंभूराजे देसाई,शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव ,संपर्कप्रमुख शंकरभाई वीरकर यांनी मायणी जिल्हा परिषद गट विभाग प्रमुख पदी निवड केली. सदर निवड झाल्यापासून  विशाल चव्हाण यांनी मायणी गटातील मायणी, चितळी, विखळे,मुळीकवाडी, पडळ, कलेढोण,पाचवड या प्रमुख गावासह संपूर्ण गटात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन विविध समस्यांचा आढावा घेतला. 

        यानंतर त्यांनी शेतीच्या ऐन हंगामात महत्वपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पंप लाईट कनेक्शन बंद असल्याने त्याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित अधिकारी ठेकेदार यांना जाब विचारात शासकीय नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम न करता, त्यांना सहकार्य करून बळ देण्याचे ठणकावून सांगितले.

        विशाल चव्हाण यांच्या या आक्रमक पावित्र्याची धास्ती घेत विखळे येथील महिनाभरापासून जळाल्यामुळे बंद असलेला वीज वितरण डीपी अवघ्या तीन तासात सुरळीत केल्याने याअगोदर वीज नसल्याने पाण्याविना जळून जाणाऱ्या पिकाकडे हतबल होऊन होणाऱ्या  संबंधित शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

        याच बरोबर विशाल चव्हाण यांनी कलेढोण,मुळीकवाडी,पाचवड या गावातही वीज वितरण मंडळास शेतीपंप वीज पुरवठा सुरू केला असून ,झेडपी गटांमधील बंद कुपननलिका दुरुस्ती करून घेतल्या आहेत. 


        शिवसेनेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचा व पदाचा योग्य वापर करून प्रत्येक नागरिकांसाठी व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी एक शिवसैनिक म्हणून स्व.बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने कार्यरत राहून शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घर तेथे शिवसैनिक तयार करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे मायणी गट विभाग प्रमुख विशाल चव्हाण यांनी सांगितले.          

यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पाण्याची उपलब्धता मुबलक आहे परंतु गेल्या महिनाभरापासून डीपी जळाल्यामुळे बंद होता.या कारणाने गहू,हरभरा,ऊस,ज्वारी ही पिके वाळून जाण्याची भीती आम्हाला होती.वारंवार डीपीदुरुस्ती करण्यासाठी आम्ही वीज कंपनीला विनवण्या करीत होतो परंतु काम केले जात नव्हते, शिवसेनेचे विशाल चव्हाण यांनी याची दखल घेऊन केलेल्या पाठपुराव्याने तातडीने डीपी दुरुस्त झाल्याने आम्हाला आनंद झाला असून आम्ही शिवसेनेचे आभार व्यक्त करतो. – शंकर देशमुख ,शेतकरी,विखळे.

Views: 841
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
युवकांनी उद्योग व व्यवसायकडे वळावे – प्रा अजितकुमार वाघमोडे

युवकांनी उद्योग व व्यवसायकडे वळावे - प्रा अजितकुमार वाघमोडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)