करगणी जुगार अड्ड्यावर छापा आजी-माजी सरपंचासह सोळा जन ताब्यात
2 , 83, 950 रुपये, दुचाकी, चारचाकी गाड़ी ताब्यात
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी चे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पदभार घेतल्यापासूनअवैध धंद्यावर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे.
अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून धाडी टाकण्याचे सत्र सुरूच आहे, यामध्ये काल दि. 9 रोजी करगणी येथे सरगर वस्ती येथे अशोक कोंडीबा सरगर यांच्या शेतामध्ये जुगार तीन पत्ता चा खेळ सुरू असल्याची माहिती गोपनीय खबऱ्या कडून मिळाली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक दीक्षित गोडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक पोलीस अधिकारी पद्मा कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद मेमाने, राकेश पाटील, अमोल कराळे ,सुनील लोखंडे उमर फकीर, प्रवीण शिंदे ,प्रमोद रोडे, गौतम कांबळे, परशराम देशमुख, संभाजी सोनवणे व घागरे यांनी धाडी टाकल्या,त्यामध्ये जुगार तीन पाणी पत्ता खेळणारे आजी-माजी सरपंचासह सोळा जणांना ताब्यात घेण्यात आले
यामध्ये अशोक सरगर ,अविष्कार सरगर, विश्वजीत दुधाळ ,आदम मुल्ला ,अजय जगदाळे ,श्रीमंत खिल्लारी ,विजय यादव, संतोष भिडे ,रमण शेठ ,राजू शेठ ,रॉकी, संभाजी शेठ ,दादा राहणार विटा, दगडूशेठ व पिंटू दुधाळ यांना ताब्यात घेण्यात आले .त्याच बरोबर दोन लाख 83 हजार 950 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, मोबाईल, एक चार चाकी गाडी व दोन मोटार सायकल मिळून आल्या आहेत.







