दिघांची भागासाठी वाढीव 14 टोळ्या देणार
आंदोलन तात्पुरते स्थगित – अमोल मोरे
राजेवाडी कारखाना प्रशासनाने दिघंची परिसरासाठी वाढीव 14 वाढीव टोळ्या देण्याचे लेखी हमी पत्र दिल्याने राजेवाडी कारखान्यावरील आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सरपंच अमोल मोरे यांनी सांगितले.आज 4 टोळ्या दिल्या असून उर्वरित टोळ्या सोमवार पर्यंत देऊ अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन शेशगिरी राव यांनी दिल्याने आंदोलन स्थगित केले असून वेळेवर टोळ्या न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देखील अमोल मोरे यांनी दिला आहे.
यावेळी कारखाना प्रशासन व सरपंच अमोल यांच्या झालेल्या चर्चेत दिघांची परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव टोळ्या देण्याचा निर्णय झाला.
यावेळी अमोल मोरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले
आंदोलनाला पळसखेल,उंबरगाव, राजेवाडी, विठलापुर, लींगिवरे आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पळसखेल चे सरपंच दादासाहेब कुचेकर,विकास मोरे,श्रीरंग शिंदे,सागर ढोले,सोमनाथ पाटील,विठ्ठल बुधावले,रामभाऊ शिंदे, चंद्रकांत माईनकर,मुनीर तांबोळी आदी उपस्थित होते.







