• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रश्न सोडविणारे, नेते घडविणारे – राजारामबापू पाटील .

माणगंगा by माणगंगा
January 17, 2022
in सांगली
0
प्रश्न सोडविणारे, नेते घडविणारे – राजारामबापू पाटील .

प्रश्न सोडविणारे, नेते घडविणारे – राजारामबापू पाटील .

सादिक खाटीक

_______________


महाराष्ट्र राज्यातील एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याकडे पाहीले जाते . ज्यांच्या निधनाला जवळपास ३ तपे झाली तरीही त्यांच्या कार्याचा आणि स्मृतीचा जागर होतो. याचे कारण त्यांचे कार्यच कालातीत आहे . नेतृत्वाची एक पीढी घडविणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विधायक दिशा देणाऱ्या या नेतृत्वाचा १७ जानेवारी २०२२ रोजी ३७ वा स्मृती दिन आहे . त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा उजाळा .
सुमारे ५० वर्षापूर्वी महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाने थैमान घातले होते . १९७१ आणि ७२ ही दोन वर्षे तरी महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी कुट्ट वर्षे आहेत . सर्वसामान्य कुटुंबाबरोबरच बागायतदार ही रोजगार हमी योजनेवर कामाला गेल्याचे या वर्षाने अनुभवले .

पण त्यानंतर महाराष्ट्राने भौगोलिक परिस्थितीवर मात करीत झेप घेतल्याचे आपण पाहतो . महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी तालुक्यांमध्ये नदीचे पाणी लिफ्ट इरिगेशनद्वारे पोहचल्याचे आणि तिथे मळे फुलल्याचे दिसते . हा बदल घडला कसा आणि त्याची पुर्वपीठीका काय आहे, याचा विचार केला तर त्याच्या मागे राजारामबापू पाटील यांची दुरदृष्टी दिसते .


महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्षात बापू जिल्ह्याचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते . त्यापूर्वी जिल्ह्याच्या शिक्षण मंडळाचीही जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली होती . जिल्ह्याच्या सुकाळी आणि दुष्काळी भागात शाळा सुरू करण्याचा त्यांनी धडाका लावला होता . ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आणि बहुजनांची मुले नव्या काळाशी सुसंगत ज्ञान घेत होती , आणि त्यांना सुसंगत ज्ञान देण्यासाठी राजारामबापु झटत होते . याच काळात त्यांना दक्षिण महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या वास्तवाची जाणीव प्रकर्षाने झाली

. वास्तवीक त्यांचा तालुका सुकाळी. पण कोयना धरण होण्यापूर्वी पाणी नियोजना अभावी कोरडवाहू भागही मोठा होता. कराड पुढचा नदीकाठचा भाग समृद्ध पण उर्वरित तालुक्यात मोठे काम करणे बाकी होते. तिथल्या लोकांपुरतेच राजकारण केले तरीही राजकीय दृष्ट्या प्रगतीला मोठी संधी होतीच. मात्र त्या काळात सुशिक्षीत माणसे राजकारणात आली पाहिजेत आणि महाराष्ट्राचा कायापालट करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असे नेतृत्वाला वाटत होते . बॅरीस्टर बाबासाहेब खर्डेकर यांच्यासह अनेक दिग्गज वकीलांनी त्याकाळातील राजकारणावर प्रभाव पाडला होता . वकीलीचे शिक्षण घेतलेले राजारामबापू तेव्हांच्या सातारा जिल्ह्यातील आपल्या कामगिरीने चमकुन उठत होते . त्यांची कामगिरी, त्यांचे नेतृत्व पुढे नेण्यास कारणीभुत ठरत होती . दुष्काळी तालुक्यांना पाण्याची व्यवस्था लावून देणे, विहीरींची खुदाई करणे, पावसाचा प्रत्येक थेंब धरतीच्या उदरात जपून ठेवला जाईल आणि तो पिण्यासाठी कसा वापरता येईल अशा पद्धतीचे काम करणाऱ्या कर्तबगार पीढीचे राजारामबापू पाटील नेते होते .

त्यांनी अत्यंत नियोजन पुर्वक जत,आटपाडी, तासगांव मध्येही काम केले . त्या भागामध्येच आजच्या काळातील खानापूर आणि कडेगांव तालुक्याचाही समावेश होता . यासह मिरज पूर्व आणि कवठेमहंकाळ या तालुक्यातही विहीरींची कामे हाती घेतली . आणि पाण्याअभावी लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर रोखले. आटपाडी, जतच्या उमदी, संख पासून तासगांव तालुक्यातील सिध्देवाडीच्या तलावापर्यत जिल्ह्यात पाणी अडवून साठविण्याची आणि त्याचा वापर माणसांना किमान जगण्यापुरते पाणी उपलब्ध करून त्यातून पुढे शेतीसाठी पाणी कसे आणता येईल याचे नियोजन करण्याचे कार्य हेच बापूंचे राजकारणही होते आणि समाजकारणही होते .
सांगली जिल्ह्याच्या कोणत्याही, पाण्याचे दुर्भिष्य असणाऱ्या तालुक्यात गेले आणि कुठल्याही गावात चौकशी केली तर तिथल्या पाण्याचा प्रश्न राजारामबापू पाटील यांच्या काळात मार्गी लागल्याचे किंवा तशी वाटचाल सुरु झाल्याचे निदर्शनास येते. या कार्यामुळेच राजारामबापू पाटील यांच्या विषयी आस्था, निष्ठा आणि विश्वास असणारी कुटुंबं मोठ्या संख्येने आढळतात. याच कुटुंबांमध्ये कर्तृत्ववान, सुशिक्षीत, युवक बापूंच्या समाज कारणयुक्त राजकारणांकडे आकर्षित झाले

. तालुक्यातील पारंपारिक तालेवार नेतृत्वापेक्षा हे नवे नेतृत्व विचाराने प्रगल्भ, सामाजिक कार्यासाठी योगदान देईल असे आणि प्रसंग आला तर पर्यायी राजकीय नेतृत्व म्हणून पुढे येईल असे घडविण्यावर राजारामबापूंनी भर दिला . सांगली जिल्ह्यापुरते त्याचे उदाहरण द्यायचे म्हंटले तर नानासाहेब सगरे, अजितराव घोरपडे पंडीतराव जाधव, रामराव सावंत, बसवराज पाटील, कल्लाप्पाआण्णा होर्तीकर, रामभाऊ आण्णा मोर्डी , इलियास नायकवडी, दिलीपतात्या पाटील, व्यंकाप्पा पत्की, शरद पाटील, रावसाहेब पाटील वगैरे मान्यवरांच्या नेतृत्वाकडे पहावे लागते. बापूंच्या निधना नंतर सुद्धा या लोकांनी बापूंचा विचार जिवंत ठेवला . शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन असो की तालुक्यांचा पाणी प्रश्न सोडविणे असो, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणी असो किंवा स्पर्धेतून चांगले सहकारी साखर कारखाने, संस्था चालवून शेतकऱ्यांना भाव मिळवून देणे असो. राजारामबापूंच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी हे कार्य धडाडीने घडवून दाखविले आहे .

राजारामबापूंच्या नंतर त्यांच्या संस्था बंद पडल्या नाहीत . उलट बापूंचा विचार मनात रुजलेल्या कार्यकर्त्यानी बापूंच्या संस्था उर्जिता वस्थेला पोहचविल्या. राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याचे चार चार युनिट आज सुरु आहेत आणि जगभरातील अभ्यासक हा चमत्कार पाहण्यासाठी वाळवा तालुक्यात येतात हेच बापूंच्या जीवित कार्याचे रहस्य आहे . जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी या विचाराला अधिक पुढे नेले आहे .

बापूंनी राज्यात आदर्श कामगिरी घडविली तर त्यांचे सुपुत्र जयंतराव पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील घाना या देशापर्यत साखर कारखानदारी पोहचविली . तिथल्या लोकांना रोजगार मिळवून देण्याबरोबर तंत्रशुद्ध ऊस शेती आणि आर्थिक शिस्त असणारी कारखानदारी चालविण्याचे तंत्र दाखवून दिले आहे . हा विचार घडतो तोच मुळात एका शिस्तबद्ध कार्यामुळे .
महाराष्ट्राच्या स्थापनेला ६० वर्षे झाली असताना राजारामबापूंनी सहकार, शिक्षण, जलसंधारण, वीज, पाटबंधारे, उद्योग, अर्थ, नियोजन आणि याच बरोबरीने महसुल या क्षेत्रात जे शिस्तबद्ध काम केले त्याचा फायदा हिरक महोत्सवी महाराष्ट्राला होतो आहे,

ते दिसून येते आहे . उद्योगांची उभारणी, ग्रामीण भागापर्यत वीज पोहचविणे, पाण्याचा प्रश्न यासाठी राजारामबापूंनी जीवापाड मेहनत घेतली . मुंबई पासून नाशीक पर्यत आणि विदर्भापासून कोकणापर्यत वेगळी दृष्टी ठेवून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना बापूंनी आपल्याकडे असणाऱ्या मंत्री पदाच्या माध्यमातून सामाजीक कार्यात जोडून घेतले . आणि त्या त्या भागातील सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले . वीज, पाणी, उद्योग आणि रोजगार हे महाराष्ट्राचे मुख्य प्रश्न होते . त्या त्या काळात ते खाते राजारामबापूंकडे होते आणि त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग आपल्या त्या त्या विभागांना करून दिला . ज्यामुळे महाराष्ट्रातील हे प्रश्न सोडविण्यास चालना मिळाली .
उद्योगमंत्री म्हणून राजारामबापूंनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचे काम केले .

स्व . यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची जडणघडण करताना ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राला एकसंध करण्यासाठी कृषी – औद्योगीक संस्कृतीचा पाया रचला . आणि त्याला सहकाराची उत्कृष्ट जोड दिली . याच मार्गाने मार्गक्रमण करीत राजारामबापूंनी १९४५ साली कासेगाव एज्यूकेशन सोसायटीची स्थापना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी केली . राजारामबापूंच्यावर त्यांच्या वडिलांच्या संस्काराचा आणि वडिलांचे मित्र असलेल्या साने गुरुजींचा प्रभाव होता . साने गुरुजींनी एकदा त्यांच्या बाबत वक्तव्य करताना ” राजाराम ” महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची व्यक्ती ठरणार असे भाकीत वर्तविले होते . १९५२ साली वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी बापू जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले . मागासवर्गीयांच्या मंदिर प्रवेशापासून विविध सामाजीक संघर्षही त्यांनी केले. १९६२ साली वाळवा मतदारसंघातून प्रथम आमदार होवून पुढची २२ वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणावर आपला ठसा उमटविला .

वाळवा सहकारी साखर कारखाना जो आज राजारामबापूंच्याच नावाने प्रसिद्ध आहे त्याची उभारणी अवघ्या १४ महिन्यात त्यांनी करून दाखविली आहे वाळवा तालुक्यात सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होताच, आज हा तालुका देशातील सर्वोच्य उत्पन्न असणाऱ्या तालुक्यांपैकी एक आहे आणि या तालुक्यातील उर्वरीत दारीद्र रेषेखालील घटकांचे दारीद्रय निर्मुलन करण्याचा पुढचा टप्पा त्यांचे सुपुत्र ना . जयंतराव पाटील यांनी घेतला आहे . बापूंनी स्थापन केलेल्या सर्व संस्था किर्ती शिखराला पोहोचल्या . त्यांच्या कार्यकर्त्यानी यशोशिखरे गाठली . आणि जयंतरावांनी त्यांच्या सामाजीक कार्याला सोन्याचा कळस चढविला .

असे म्हटले तर वावगे होणार नाही . आज जयंतराव पाटील महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी मंत्र्यापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहेत . १९९९ साली महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गडगडली असताना जयंतरावांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली . विशेष म्हणजे त्यापूर्वी राज्यमंत्री पदाचा ही अनुभव नसताना पहिल्याच वेळी थेट कॅबिनेट मंत्री आणि पुढची ९ वर्षे सलग आर्थिकदृष्टया सक्षम असा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री, २६ / ११ च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सावरणारे गृहमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, आणि महाविकास आघाडीच्या सरकार मधले जलसंपदा मंत्री म्हणून त्यांचे काम कौतुकास्पद घडले कारण या कार्याला दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या कार्य कर्तृत्वाचे अधिष्ठान आहे .


महसुलमंत्री राजारामबापूंचे योगदान – महाराष्ट्र राज्य हे वेगवेगळ्या ३ विभागातून एकत्र झालेले राज्य असलेने येथे महसुलाच्या ३ वेगवेगळ्या कर पद्धती लागु होत्या . या तीन कर पद्धती रद्द करून संपूर्ण राज्यासाठी एकच कर पद्धती, हे बापुंचे महाराष्ट्रासाठीचे योगदान आहे . आज देशात ” एक देश , एक कर पद्धती ” हे धोरण अवलंबले गेले आहे. पण या धोरणालाच जन्म मुळात १९६६ साली राजारामबापूंनी दिला . शेतकऱ्यांच्या खाते पुस्तिका बनविण्याचा निर्णय ही त्यांचाच . पंढरपुरच्या श्री . विठ्ठलाची महापुजा ही शासकीय महापुजा बनविणारे पहिले महसुलमंत्री राजारामबापू होते . पहिल्या शासकीय पुजेचे भाग्य लाभलेले बापू हे मुख्यमंत्री झाले नाहीत . मात्र पुढे झालेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या भाग्यात श्री . विठ्ठलाची महापुजा आली . हे कार्य राजारामबापूंचेच .


वीज मंत्री म्हणून ग्रामीण महाराष्ट्रात शेतीला आणि घरगुती वापरासाठी वीज पुरविणे आणि त्याची निर्मिती करणे यासाठी राजारामबापूंना प्रचंड कष्ट घ्यावे लागले . वीजेची निर्मिती हे एक मोठे आव्हान असताना त्यांनी महाराष्ट्रात उदयोग धंद्याची उभारणी जितक्या लिलया केली तितक्याच कष्टपूर्वक वीज निर्मितीवर भर दिला . संपूर्ण महाराष्ट्रात औदयोगिक विकास महामंडळाच्या वसाहती निर्माण करणारे राज्य म्हणून त्यांची ओळख झालीच होती . तुम्ही उद्योगां खाली इतकी शेती आणत चालला आहात की भविष्यात शेती करण्यासाठी तरी जमीन शिल्लक राहील की नाही असा प्रश्न विरोधक विधानसभेत विचारत होते . ही खरे तर बापूंच्या विचारांची, कार्य कर्तृत्वाची पोहोच पावती . आज महाराष्ट्र देशात नंबर एक चे राज्य आहे .

ते या उद्योग व्यवसायामुळेच आणि उद्योगातून सरकारला मिळणाऱ्या महसुलामुळेच . देशात जास्तीत जास्त उद्योगधंदे सुरु झाले पाहीजेत . आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या मोठ्या लोकसंख्येला या उद्योगांमध्ये रोजगार मिळाले पाहीजे असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारचे धोरण होते तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अधिकृत धोरण आहे . पण उद्योग मंत्री राजारामबापूंनी केलेल्या कार्यात ७० आणि ८० च्या दशकातच महाराष्ट्राने त्या दृष्टीने वाटचाल केलेली होती, हे अभिमानाने सांगावेशे वाटते . कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यातील अनेक गावांना राजारामबापू वीजमंत्री होईपर्यत वीजच मिळाली नव्हती . दुष्काळी जत तालुक्याला अंधार युगातून बाहेर काढणारे राजारामबापू हेच होते . अशा या महामानवाचे स्मारक भारत – श्रीलंका आंतरराष्ट्रीय महामार्गावर कासेगाव येथे उभे करण्यात आले आहे .

त्या स्मारकाचे नावच पदयात्री असे आहे. काश्मीर ते कन्याकुमारी भारत जागृती करण्यासाठी निघालेल्या माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या ऐतिहासीक पदयात्रेला भक्कम साथ देणारे म्हणून राजारामबापूंची ख्याती आहे . त्यांनी आयुष्यात अनेक पदयात्रा काढल्या . १९७५ साली २० कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी साठी वाळवा तालुक्यात ६५० कि .मी .ची काढलेली पदयात्रा, सांगली ते उमदी २५० कि.मी. ची पदयात्रा, चंद्रशेखर यांच्या बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते धुळे जिल्ह्यातील बीजासन पर्यतची ११०० कि.मी. ची पदयात्रा, जळगांव ते नागपूर १७ दिवसांची ४६५ कि.मी. ची पदयात्रा आणि शेतकरी दिंडी, ही त्यांच्या आयुष्यातील पदयात्रांची मोठीच आख्यायिका आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी ११०० कि.मी. चाललेले राजारामबापू कोणत्या ध्येयाने झटत असतील याची कल्पनाच ही पदयात्रा देते.१७ जानेवारी १९८४ या एका काळ्याकुट्ट दिनी, अंधाराने या विकास सुर्याला व्यापले . लोकांशी चालता बोलता संवाद साधणारा, लोकांचे प्रश्न जाणणारा आणि लोकांचे दुःख समजून त्यावर फुंकर घालणारा, एक महामानव काळाच्या उदरात गडप झाला . अंधार , सुर्याच्या किरणांना काही काळच रोखू शकतो . बापू लौकीक अर्थाने या जगाचे उरले नाहीत पण त्यांनी घडविलेले कार्यकर्ते आजही तेजाने तळपत आहेत . आप आपल्या भागातील जनतेचे प्रश्न सोडवित आहेत .

वाळवा तालुक्याचा खुप मोठा भाग कोरडवाहू होता, तो ओलीताखाली आणण्यासाठी ५० हजार एकरावर पाणी वापराचे परवाने राजारामबापूंनी मिळविले होते . मात्र मृत्यूने त्यांना ते कार्य पुर्ण करण्यापासून रोखले, जणू नियतीने हे कार्य पुढे ठेवून त्यांचे सुपुत्र जयंतरावांना एक आव्हान दिले होते . पित्याचे कार्य आणि शिकवण किती समजली याची परिक्षाच ते काम बघणार होते . शिक्षणाने इंजिनियर असलेल्या जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील त्या ५० हजार एकर जमिनीला ओलीताखाली आणण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना उभ्या केल्या . या कार्यासाठी आपल्या सामाजीक कार्याची सुरुवात त्यांनी पदयात्रा काढून केली आणि राजकीय आयुष्याच्याच प्रारंभालाच ५० हजार क्षेत्र ओलीताखाली आणणारा युवक अशी स्वतःची आगळी वेगळी ओळख महाराष्ट्राला निर्माण करून दिली .

स्वतःच्या आयुष्याच्या हिरक महोत्सवाची वाटचाल करणारे जयंतराव पाटील यांच्या कारकिर्दीत उमदी, संख सह दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी देण्याचे राजारामबापूंचे स्वप्न पुर्णत्वाकडे चालले आहे . जणू आपले स्वतःचेच स्वप्न पुर्ण करण्यासाठी बापूंनी जयंतरावांच्या पाठीशी ही शक्ती उभी केली आहे …………
तीर्थस्वरूप बापुंना विनम्र अभिवादन .

Views: 658
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
लव्हु मिसाळ यांनी एक एकरात वांग्याच्या पिकातून कमावले साडेतीन लाख…..

लव्हु मिसाळ यांनी एक एकरात वांग्याच्या पिकातून कमावले साडेतीन लाख.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)