• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

लव्हु मिसाळ यांनी एक एकरात वांग्याच्या पिकातून कमावले साडेतीन लाख…..

माणगंगा by माणगंगा
January 17, 2022
in सातारा जिल्हा
0
लव्हु मिसाळ यांनी एक एकरात वांग्याच्या पिकातून कमावले साडेतीन लाख…..

लव्हु मिसाळ यांनी एक एकरात वांग्याच्या पिकातून कमावले साडेतीन लाख

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

अलीकडे निसर्गाचा लहरीपणावर शेतीचे गणित अवलंबून राहू लागले आहे. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ , कधी अवकाळी पाऊस , कधी अतिवृष्टी , कधी बाजारातील मंदी तर कधी वाढता उत्पादन खर्च आदी कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याला शेतीतील उत्पादन खर्च निघत नाही. असे असतानाच वरकुटे – मलवडी ता. माण येथील शेतकरी लव्हु रखमाजी मिसाळ यांनी वांगी पिकाबरोबर मिरची हे दुहेरी पीक घेऊन कमी उत्पादन खर्चात जादा उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या या प्रयत्नाला यश येत आहे.


लव्हु मिसाळ यांनी एक एकरात मुख्य पीक म्हणून वांंग्याचे घेतले असून अंतर्गत पीक मिरचीचे पीक घेतले आहे. त्यांनी चार फुटी सरीत वांग्याच्या चार हजार रोपांची लागण केली . त्याच पीकात सुमारे तीन ते साडेतीन हजार मिरचीच्या रोपांची लागवड केली. पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर केला आहे. मिसाळ यांच्या वांगी पिकांचे तीन ते चार तोडे झाले असून सध्या त्यांना आटपाडी व म्हसवड बाजारात झालेल्या लिलावात वांगी तब्बल ११० रुपये किलो दराने विक्रेत्यांनी खरेदी केले. १५ किलोच्या कँरेटला तब्बल १६५० रुपयांची बोली लागली. आतापर्यंत त्यांना तीन लाख रूपये मिळाले आहेत. दिवसेंदिवस वांग्याला चांगला भर येत असून आतापर्यंत चौथ्या व पाचव्या तोड्याला अडीच ते पावणे तीन टन वांगी मिळाली आहेत. मुंबई बाजार पेठेत हाच दर दहा किलो ला १५०० ते १६०० रूपये आहे. वांग्याचे तोडे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केले जातात. पुढचे एक ते दोन महिने अजून तोडे सुरू राहणार आहेत. त्यामुळे कमीत कमी दर धरला तरी खर्च वजा आता तीन ते साडेतीन लाख रुपये मिळू शकतात.


सध्या शेतीला वाईट दिवस आले असल्याने दुहेरी पीक लावले . उत्पादन चांगले निघत असल्याने दर परवडत आहे. महागाईच्या तुलनेत दर कमीच आहेत. स्वतः कष्ट असल्याने आणि उत्पादन खर्च कमी केल्याने खर्च वजा करता तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे असे लव्हु मिसाळ यांनी सांगितले. मिसाळ यांनी हा वांग्याचा प्लाँट संपतो ना संपतो तोच दुसऱ्या प्लाँटमध्ये वांग्याची लागण केली आहे. शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता आधुनिक तंत्राचा वापर करत अंतर्गत पिकांवर भर दिल्यास शेतीतून आर्थिक प्रगती साधता येईल , असेही त्यांनी सांगितले.

चौकट

अंतर्गत पिकाचा फायदा

सध्या शेतीपिकाला बाजारभाव मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर एका पिकाला बाजारपेठेत चांगला दर मिळाला नाही तर दुसऱ्या पिकाला दर मिळेल या अपेक्षेने काही शेतकरी अंतर्गत पिके घेत असतात. त्यामुळे अंतर्गत पिके फायद्याचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. मी स्वतः वांग्याच्या पिकात मिरचीचे अंतर्गत पिक घेतले आहे. त्यातून चांगले उत्पादन मिळाले असून सध्या तरी चांगला दर मिळाला आहे. अजूनही वांगी पिकांचे पिक घेतले असून त्यातही मिरची पिकांची लागण केली आहे.

- लव्हु मिसाळ , शेतकरी
  वरकुटे - मलवडी , ता. माण
Views: 379
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आटपाडी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मध्यस्थीने बळीराच्या संघटनेचे साखर करखान्याविरुद्धचे आंदोलन तात्पुरते स्थगित……..

आटपाडी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मध्यस्थीने बळीराच्या संघटनेचे साखर करखान्याविरुद्धचे आंदोलन तात्पुरते स्थगित........

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)