आटपाडी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मध्यस्थीने बळीराच्या संघटनेचे साखर करखान्याविरुद्धचे आंदोलन तात्पुरते स्थगित……..
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरु साखर कारखाना शेतकऱ्यांचा ऊस तोडणी ला विलंब लावत असल्याने आज बळीराजा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते हे आंदोलन कारखाना व्यवस्थापक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी बैठक घडवून आणली व उद्याचे होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले या बैठकीमध्ये कारखाने सर्व मागण्या मान्य केल्याचे समजते
याबत सविस्तर माहिती अशी की श्री श्री सद्गुरु साखर कारखाना ऊस तोडी च्या डोळ्या वाढवत नसून अनेक होसान्ना तुरे आले आहेत कारखाना ऊस उचलत नव्हता म्हणून बळीराजा संघटनेने उद्या आंदोलन पुकारले होते याबाबत पोलिस प्रशासनाने लक्ष घालून कारखाना प्रशासन व बळीराजा संघटनेचे नेते यांच्यामध्ये बैठक घडवून आणली आहे व योग्य तो तोडगा निघाला आहे
बळीराजा शेतकरी संघटना डॉक्टर उनमेश देशमुख ,डॉक्टर दिगंबर मोरे, जयंत गायकवाड, अशोक आबा गायकवाड ,अर्जुन वाघमारे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सर्व शेतकरी बैठकीत उपस्थित होते .
तालुक्यातील त्याचबरोबर तालुक्याबाहेर या सर्व जाणाऱ्या उसाचा सर्वे करून या भागामध्ये वरकुटे, पळसावडे ,दिघंची, झरे ,उंबरगाव ,पळसखेड या भागात लवकरात लवकर ऊसतोड सुरू करावी व जवळजवळ 20 ते 25 नवीन वाहने या भागात पाठवावेत अशा पद्धतीची सर्व चर्चा झाली आणि उद्या जे होणार आंदोलन आहे 18 :1:2022 कारखानदार दोन पाऊल पुढे आले त्यामुळे उद्याचा आंदोलन आम्ही स्थगित करीत आहोत.
.तसेच एक रकमी एफ आर पी बाबत लवकरात लवकर कारखाना प्रशासन व बळीराजा शेतकरी संघटना यांची बैठक आयोजित करण्यात येईल हे कारखाना प्रशासनाने मान्य केले आहे.
तसेच गेल्या वेळच्या एफ आर पी चे राहिलेले व्याजा बाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे…..असे डॉक्टर उनमेश देशमुख….यांनी बैठकीनंतर सांगितले.







