• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रा.डॉ. भाई एन.डी.पाटील …सर्वहारा जन आंदोलनातील तळपता तारा……कॉ.मारुती शिरतोडे…

माणगंगा by माणगंगा
January 19, 2022
in सांगली
0
प्रा.डॉ. भाई एन.डी.पाटील …सर्वहारा जन आंदोलनातील तळपता तारा……कॉ.मारुती शिरतोडे…

प्रा.डॉ. भाई एन.डी.पाटील …सर्वहारा जन आंदोलनातील तळपता तारा
……………………………..
कॉ.मारुती शिरतोडे,वाझर

अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांचे मानसपुत्र व संस्थेचे चेअरमनपद अनेक वर्षे भूषवणारे,कार्ल मार्क्स, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचा वसा घेतलेले कृतिशील समाजसुधारक म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे महाराष्ट्रातील डाव्या पुरोगामी चळवळींचे आधारवड प्रा. डॉ.भाई एन.डी. पाटील नावाचं समाज परिवर्तनाच्या लढ्यातील सतत घोंगावणारे वादळ परवा शांत झालं. भाई डॉ.एन.डी.पाटील उर्फ महाराष्ट्राचे दाजी यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि एका महान कर्तृत्वसंपन्न समाजसुधारकाला महाराष्ट्र मुकला.


गेल्या साधारणपणे तीस वर्षाच्या कालखंडात भाई एन डी पाटील यांची भाषणे अनेक वेळा ऐकायचा योग मला आला आहे. विद्यार्थी चळवळीत असल्यापासून डाव्या पुरोगामी संघटनांच्या मध्ये काम करताना विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने, मेळाव्याच्या निमित्ताने, आंदोलनाच्या निमित्ताने भाई एन डी पाटील यांचा संपर्क व्हायचा.भाषण ऐकायला मिळायचे. किमान तास-दीड तासापेक्षा अधिक वेळ आपल्या पहाडी आवाजात,समाजातील वास्तव घटनेवरील आपले अमोघ वक्तृत्वातून काळजाचा ठाव घेणारे शब्द समोरील श्रोत्यांच्या मनावर कोरणारे,धिप्पाड शरीरयष्टी लाभलेले अभ्यासू व्यक्तिमत्व भाई एन डी पाटील प्रत्येक माणसाला आवडायचे.

प्रबोधनातून व जनआंदोलनातून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न केंद्रबिंदू ठेवून गेली साठ-सत्तर वर्षे एन डी पाटलांनी अविश्रांतपणे संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने केली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली उभी हयात खर्च केली. १९७७ साली पुरोगामी लोकशाही दलाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून काम करत असताना भाई एन.डी पाटलांनी आपला वेगळा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटवला.त्यांच्याच कारकिर्दीत आमच्या वाझरला येरळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मंजूर झाला.पवार सरकार बरखास्त झाल्याबरोबर मंत्र्यांना असणारे शासकीय वाहन जाग्यावर सोडून पुढील प्रवास एस.टी.ने करणारे दाजी खरोखरच अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व होते.

त्याचबरोबर केवळ सत्ता सेवेचे साधन नसतं तर सत्तेच्या सिंहासनावर पैसा दहशत गुन्हेगारी भ्रष्टाचार अशा अवैधरित्या कोणत्याही मार्गाचा वापर करून सत्तेवर जे येतात ते कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देतातच असे नाही तर कष्टकरी,शेतकरी,कामगारांच्या संघटित सामर्थ्याच्या बळावर निरअंकुश सत्ता प्रस्थापित व्हावी यासाठी लोक आंदोलन हेच सत्ता प्रस्थापित करण्याचे कष्टकऱ्यांच्या हातातील प्रभावी हत्यार असतं हे आपल्या आचरणातून एन.डी पाटलांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. एन डी पाटलांनी विद्यार्थी जीवनापासूनच आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केलेली दिसून येते.

यामध्ये दारूची दुकाने बंद करा,महागड्या दराने जनतेला दिले जाणारे वीजदर रद्द करा, एन्रॉन कंपनीची हकालपट्टी करा,अशी शेकडो आंदोलने,तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात, साराबंदी आंदोलनात, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात, उपासमार विरोधी कृती समितीच्या आंदोलनात, जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या आंदोलनात,जात्यांध,धर्मांध शक्तींच्या विरोधात महाराष्ट्रातील सामाजिक समता परिषदात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात पुढे होऊन करणारा अग्रभागी राहणारा हा लढवय्या वयाच्या 93 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला.१९७२ साली या महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला होता.

माझे आई वडील सांगत होते की मारुती तुझा जन्म बहात्तरच्या सरत्या दुष्काळात झालाय.अशा त्या दुष्काळात माणसं अन्न अन्न करून भुकेकंगाल झाली होती, माणसांना अन्न नाही पाणी नाही काम नाही धंदा नाही मजुरी नाही जनावरांना चारा नाही अशा भयाण काळात कष्टकरी जनता जनावरं तडफडत असताना भाई एन डी पाटील सारखा कार्यकर्ता स्कूटर वरून, एसटीने, बुलेट गाडी वरून गावोगावी सभा बैठका भेटी घेऊन दुष्काळग्रस्तांना धीर देत होता.

त्यांच्या अडचणी जाणून सोडवून घेण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न करत होता आणि दुष्काळ ही केवळ नैसर्गीक आपत्ती नाही तर राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाची निष्पत्ती आहे असे टाहो फोडून जनतेला सांगत होता. त्याचबरोबर याच दुष्काळामध्ये १९ऑक्टोंबर १९७२ ला इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर दुष्काळग्रस्तांचा विराट मोर्चा एन.डी.पाटील,भाई गणपतराव देशमुख,जी.डी.लाड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता.

या मोर्चातील काम दाम आणि चारा मागणाऱ्या जनतेला वसंतराव नाईक सरकार ने गोळीबाराने उत्तर दिलं आणि त्या गोळीबारात दिलीप निलाखे, रंगा गायकवाड, सुरेश पाटील आणि राजेंद्र पाटील या चार तरुणांना हौतात्म्य पत्कराव लागलं.आपला पुतण्या गोळीबारात ठार झाला,खुद्द एन.डी पाटील यांच्या पाठीवर सुद्धा लाठ्यांचा वर्षाव झाला तरीही दाजी मागे हटले नाहीत

.केवढे हे धैर्य. त्याच बरोबर वैरागलासुद्धा दुष्काळग्रस्त जनतेच्या मोर्चावर गोळीबार झालेला होता अशा या आक्रमक विराट लढ्यामुळे आणि हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्ता मुळे तत्कालीन राज्यकर्त्यांना रोजगार हमी कायदा करणं भाग पडलं हे महाराष्ट्रातील जनता कधीही विसरू शकणार नाही.त्याचवेळी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या आणि स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवठा करावा लागला हे ही महाराष्ट्र जाणून आहे. खरंतर मी शिक्षण क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वांगीण विकासाचे आणि राष्ट्राच्या उद्धाराचे सर्वात मोठे प्रभावी साधन हे सर्व मान्य आहे. केवळ दारिद्र्य आणि अज्ञानामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. सर्वांना शिक्षण सर्वांसाठी समान शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन एन डी पाटील आयुष्यभर झगडत आले. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी असताना शिक्षणासंबंधी ची श्वेत पत्रिका काढुन त्यांनी प्रगत आणि सामान्यांसाठी अशा दोन विभागात शिक्षणाची विभागणी केली होती.

धनिकांच्यासाठी वेगळ्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता.त्यामुळे कष्टकरी समाज शिक्षणापासून कायमस्वरूपी वंचित होण्याचा धोका तयार झाला होता हे संकट हाणून पाडावे म्हणून भाई एन डी पाटील यांनी श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप हे स्वतंत्र छोटसं पुस्तक लिहून महाराष्ट्रातील जनतेसमोर आणले. विविध ठिकाणी शैक्षणिक परिषदा घेऊन श्वेतपत्रिकेच्या विरुद्ध प्रभावी आंदोलन संघटित केले गेले.त्यामुळेच महाराष्ट्र सरकारला गरिबांचं शिक्षण हिरावून घेणारी श्‍वेतपत्रिका मागे घ्यावी लागली होती.

शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी हे पुस्तक सुद्धा एन.डी. पाटलांनी लिहिलं होतं. खरंतर दाजींच्या कामाचा आवाका इतका मोठा होता की विविध क्षेत्रात अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करणारा आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा तळातल्या कार्यकर्त्याला हृद्यात जपणारा,प्रभावी नेता असा होणे नाही. 20 जून 2013 ला जेव्हा कोल्हापूरला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे गट एकत्र करण्यासाठी बैठक झाली होती.

मी त्या बैठकीला हजर होतो.भाई एन डी पाटील, गोविंद पानसरे आणि जेष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे यांनी महाराष्ट्रातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीत वेगवेगळे कार्यरत असणारे गट एकत्र करण्यासाठी जे मार्गदर्शन केले होते ते खूप मोलाचे होते.परंतु आजही विद्रोहीच्या नेत्यांनी त्यावर गंभीरपणे विचार करुन परिवर्तनाच्या चळवळीत विद्रोहींचा एक मोठा एकत्रित प्रवाह व्हावा म्हणून फारसे प्रयत्नं केल्याचे दिसून येत नाही.त्या बैठकीला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने कॉम्रेड धनाजी गुरव, कॉम्रेड किशोर ढमाले, वाहरू सोनवणे, प्रा.डॉ.बाबुराव गुरव ,पार्थ पोळके,किशोर जाधव,असे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते हजर होते.

नेतृत्व कसे असावे याचा वस्तुपाठ जसा क्रांतिवीर नागनाथ नायकवडी,कॉम्रेड गोविंद पानसरे ,जी.डी. लाड यांनी आपल्याला घालून दिला तसाच एक आदर्श कृतिशील आणि वैचारिक नेत्याच्या स्वरुपात भाई एन.डी.पाटील यांनीही घालून दिला आहे.

आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत समाज परिवर्तनाच्या लढ्यात लढलेला, विकासाच्या गोंडस नावाखाली सेझच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या भुमिपुत्रा ला आपल्या जमीनीतून हुसकावून लावणाऱ्या सरकारचं षड्यंत्र हाणून पाडणारा, एन्रॉन प्रकल्प रद्द करण्यासाठी कायम रस्त्यावरच्या लढाईत असणारा, महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी होऊ नयेत,शेतकर्यांच खरंच नुकसान होऊ नये म्हणून लढा उभारणारा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून अखेरपर्यंत झटणारा, सर्वसामान्य माणसाला रेशन आणि गरिबाला चांगलं शिक्षण मिळावं या साठी आयुष्यभर काम करणारा एन डी पाटील नावाचा ज्वालामुखी आता कायमचा शांत झाला.भाईंच्या विचार व कृतींचा वसा आणि वारसा प्रत्येकाने घेतला तरच भविष्यकाळ सुकर ठरेल असे मला वाटते.भाई डॉ. एन .डी पाटील यांच्या स्मृतीस माझा अखेरचा क्रांतिकारी लाल सलाम.

कॉम्रेड मारुती शिरतोडे
वाझर,ता.खानापूर जि.सांगली

Views: 267
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
वातावरणामुळे यंदा कांदा करणार वांदा… फवारणीचा खर्च दुप्पट वाढला

वातावरणामुळे यंदा कांदा करणार वांदा... फवारणीचा खर्च दुप्पट वाढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)