सोन्याचे दागिने अपहार प्रकरणी गुन्हा दाखल
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी – दादासाहेब आटपडकर यांनी सोन्याच्या दागिन्यांचा(7लाख 42 हजार) रुपये किमतीचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की विजय रमेश जगदाळे गलाई व्यवसायीक असून त्याचे मुळगाव बिदाल ता माण जिल्हा सातारा आहे.
विजय जगदाळे यांचे मेहुणे सचिन प्रेमचंद भोसले असून सचिन भोसले यांना दागिने देण्याचे होते ते दागिने आटपाडी तील साठेचौकात दादासाहेब शिवाजी आटपाडकर राहणार विरळी ता माण जिल्हा सातारा यांच्याकडे दिले होते.
,त्याची बाजारभप्रमाणे 7 लाख 47 हजार रुपये किंमत होत आहे.
परंतु विजय जगदाळे यांचे मेव्हणे सचिन भोसले यांना दादासाहेब आटपाडकर यांच्या कडून दागिने मिळालेच नाहीत. तर त्या दागिन्याचा आटपडकर यांनी अपहार केल्याचे स्पस्ट झाले प्रकरणी आटपाडकर यांच्याविरोधात विजय जगदाळे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.







