संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या वतीने ट्युशन फी मध्ये 50 टक्के सवलत मिळवून, महाविद्यालय शुल्कामधील अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्याची कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेकडे मागणी…
दोंडाईचा- ता. 26 (श. प्र.) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसा करिता जळगाव, धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी दोंडाईच्यात सौरभ मंगल कार्यालयात शिंदखेडा, दोंडाईचा कॉग्रेस पदाधिकारी, कार्यकर्तांच्या उपस्थित आढावा बैठक घेत केंद्र सरकार सडकून टिकात्र सोडले होते. यावेळी संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या वतीने ट्यूशन फी मध्ये 50 टक्के सवलत म्हणून महाविद्यालयीन शुल्कामध्ये अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले होते की, covid-19 विषाणूच्या महामारीमुळे जवळपास वर्षभरापासून टाळेबंदीची परिस्थिती ओढवलेली आहे. अशा परिस्थितीमुळे बरेच पालक वर्गाला बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे .सर्व व्यवसायदेखील अत्यावश्यक वगळता ठप्प झाले आहेत. अशा परिस्थिती उद्भवली असताना सुद्धा काही महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या महाविद्यालयीन शुल्क मध्ये वाढ करीत सुधारित शुल्क रचना जाहीर करून नमूद रचनेनुसार रक्कम वसूल केली आहे, आणि करत आहेत.
या रचनेमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष उपभोगत नसलेल्या विभागांच्या शुल्कांचा देखील समावेश आहे. अनावश्यक विभागांमध्ये साधारण डेव्हलपमेंट फी, लायब्ररी फी, स्टेशनरी अँड जनरल फी, जिमखाना फी, स्पोर्ट्स फी, इंटरनेट फी, यास आदींचा समावेश आहे. रोग निर्मूलन योजना आणि इतर कार्यक्रमांच्या थी या श्लोकांचा देखील समावेश होतो.
Covid-19 महामारी चरित्र लाटेत विद्यार्थ्यांसह पालक वर्ग देखील प्रादुर्भाव ला अपवाद ठरला नाही शेतकऱ्यांना मध्यमवर्गी कुटुंबियांना सुदर्शन अनपेक्षित खर्च त्यांना सामोरे जावे लागत आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे कुटुंब प्रमुख व्यक्तींना देखील गमवावी लागली आहे या परिस्थितीमधून बाहेर पडत पूर्ववत होण्यासाठी मध्यमवर्ग आणि शेतकरी वर्गाला निश्चितपणे बराच कालावधी लागणार आहे.
तरी सर्व अनावश्यक विभागांचे रद्द होऊन सरकार मार्फत ट्युशन फी मध्ये 50 टक्के सवलत मिळावी याचबरोबर महाविद्यालयांनी भरणा करण्याच्या अटी शिथिल कराव्यात ही मागणी समस्त राज्यातील विद्यार्थ्यांसह पालक वर्गाकडून होत आहे तरी ट्युशन मध्ये 50 टक्के सवलत मिळण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, यांच्यासमवेत संयुक्त विद्यार्थी संघटनेचे बैठक आयोजित व्हावी. अशा आशयाचे निवेदन कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे संयुक्त विद्यार्थी संघटनेचे जनसंपर्क प्रमुख खान्देश विभागाचे प्रशांत विनोद भट यांनी दिले आहे. याप्रसंगी दीपक जगदाळे, निरंजन करणके, मयुरेश जैन, आकाश राजपूत,प्रेमसिंग राजपूत आदी उपस्थित होते