पटेल शाळेत शिवजयंती उत्साहात
त-हाडी :- शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली होती. तर काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडे सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची दिनांक १९ फेब्रुवारी रोजी जयंती होती. यावेळी शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळा येथे शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता चौथीतील विद्यार्थी
रोहन श्रीधर गुंजाळ छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती तर जिजाऊंच्या वेशभूषेत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कशिश राजेश चौधरी,रश्मीता गजेंद्र जाधव,मानसी प्रकाश माळी,प्रतीक्षा गोविंद पाटील यांनी केलेली होती.
यावेळी मुख्याध्यापक सी. डी. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.इयत्ता चौथीतील विद्यार्थी वेदांत प्रशांत पाटील याने शिवरायांवर सुंदर पोवाडा सादर केला.मधुबाला यादव बुवा,ध्रुवीता अनिल चौधरी,राज किसन कोल्हे,समीहान किरण गोराणे,प्रेमराज संभाजी बोरसे या विद्यार्थ्यांनी शिवरायांविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले.यावेळी इयत्ता बालवाडी तील विद्यार्थिनी मनस्वी संदीप पवार हिचा वाढदिवस असल्याने तिने शाळेला शिवचरित्र हे पुस्तक भेट दिले.
यावेळी मुख्याध्यापक सी डी पाटील, वसंत भामरे,गणेश चौधरी, अशोक पाटील, गजेंद्र जाधव, विवेकानंद ठाकरे, के.डी.राजपूत,प्रशांत चौधरी, महेंद्र माळी,विनोद माळी, अरुण हातेडकर,जितेंद्र करंके,सुशीला मराठे,सुवर्णा सुर्वे,उज्ज्वला पाटील,राजेश्वरी ढिवरे,संजाली शिरसाळे, पूनम सूर्यवंशी, अर्चना जोशी,संगीता चव्हाण,शुभांगी बाविस्कर व वैशाली बारी आदी उपस्थित होते.