ओबीसीचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल ते सांगा सत्तेत येण्याची गरज नाही – फडणवीस यांना जयंत पाटलांचे उत्तर
सांगली – सत्तेत आल्यानंतर ओबीसी चा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा आम्ही प्रश्न सोडवू त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही जनतेने तुम्हाला नाकारले आहे असा टोलाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला…
नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते… सत्तेत आल्यानंतर 4 महिन्यात ओबीसी चा प्रश्न सोडवू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता… यावर जयंत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले… सत्तेत आल्याशिवाय महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीच मदत करायची नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असे वाटत नाही.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांना दोन अडीच वर्षे तुरुंगात का खितपत पडावे लागले त्यांना यातना का दिल्या , पक्षातीलच ओबीसी नेते एकनाथ खडसे यांना पक्षातून बाहेर पडण्यासारखी परिस्थिती का निर्माण केली असा सवालही जयंत पाटील यांनी यावेळी उपास्थित केला…