निंबवडेत ई पिक पहाणी प्रशिक्षण संपन्न
मौजे निंबवडे तालुका आटपाडी येथे ई पीक पाहणी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित शेतकरी खातेदार बंधूंना ई पीक पाहणी अँप द्वारे शेतात पेरलेल्या पिकाचे नोंद कशा पद्धतीने घ्यावयाची याविषयी सविस्तर माहिती मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री शिवाजी सूर्यवंशी यांनी केले ई पीक पाहणी ॲप द्वारे शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या शेतात जाऊन आपल्या सातबारावरील पिक पेरा नोंद घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले
या ॲप मधून जर पीक पाणी नोंद न केल्यामुळे कोणतीही शासकीय मदत पिक विमा पिक कर्ज किंवा नुकसानीचे अनुदान प्राप्त होण्यासाठी शासनाने अतिशय चांगला उपक्रम चालू करून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप द्वारे त्यांचा सातबारावरील पीक नोंदणी त्यांच्या स्वतःच्या हातात दिलेला आहे.
सदर कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य शेतकरी तसेच कृषी सहायक श्री शिवाजी सुर्यवंशी, ग्रामसेवक श्री संजय करणे , श्री पोपट वाघमारे व शेतकरी बंधू उपस्थित होते.







