पात्र घरकुल लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत शी संपर्क साधावा – सरपंच अमोल मोरे
आटपाडी/प्रतिनिधी
दिघंची मधील ड यादी मधील पात्र घरकुल लाभार्थ्यांनी दिघंची ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधन्याचे आवाहन सरपंच amol मोरे यांनी केले आहे. आत्तापर्यंत दिघंची ग्रामपंचायत ने आटपाडी तालुक्यात विक्रमी घरकुल वाटप केल्याचे amol मोरे यांनी सांगितले
सरपंच अमोल मोरे यांनी सांगितले की सध्या ड यादी मधील पात्र घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून कागद पत्रांची पुर्तता करावी.
घरकुल योजना ही शासन परदर्शक पणे पार पाडत असतो.त्यामुळे जर घरकुल योजनेच्या नावाखाली कोण पैशाची मागणी करत असेल तर त्याची तक्रार ग्रामपंचायत कडे अथवा संबंधित कार्यालयाकडे करावी.कोणालाही पैसे देऊ नये असे आवाहन् सरपंच अमोल मोरे यांनी केले .







