बनपुरी विकास सोसायटीत 30 वर्षांनी परिवर्तन
भाजप -शिवसेना -रासप ने मारली बाजी ….
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील बहुचर्चित बनपुरी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली,त्यामध्ये आम, गोपीचंद पडळकर ,जि.म. बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व राष्ट्रीय समाज पक्ष या एकत्रित पॅनेलने महादेव पाटील गटाचा 13:0 ने धुव्वा उडविला.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राजेंद्र अण्णा देशमुख गट आणि गोपीचंद पडळकर गट यांनी एकत्रित निवडणूक लढवून सत्ता काबीज केली होती.पण या निवडणुकीत महादेव पाटील गटाचा 70 ते 80 मतांच्या फरकांनी पराभव झाला. राजेंद्रअण्णा देशमुख गटाचे मजूर फेडरेशनचे सांगली चे व्हा. चेअरमन व विद्यमान सरपंच पती महादेव पाटील हे नेतृत्व करीत होते..
सोसायटी स्थापनेपासून महादेव पाटील यांचा गट सत्तेत होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पडळकर आणि देशमुख यांची एकत्रित सत्ता होती.
पण या निवडणुकीत मच्छिंद्र पाटील , हणमंत पाटील ,घमाजी बुरुंगले ,संजय यमगर ,बिरु बंडगर आणि लक्ष्मण सरगर यांच्या सहकार्याने एकतर्फी विजय मिळविला… ही निवडणूक प्रथमच जनतेने हातात घेतली होती
लोकांच्या अडीअडचणी सोडवणे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सोसायटीचा उपयोग करणे हे एकच ध्येय आहे असे नूतन सदस्यांनी या प्रसंगी सांगितले
पडळकर गटाचे नेतृत्व हणमंत पाटील ,मच्छिंद्र पाटील ,विकास पुकळे ,मोहन यमगर यांनी केले.
विजयासाठी मोलाचा वाटा उचलण्यात सोसायटीचे विद्यमान चेअरमन दादा यमगर ,माजी सरपंच हणमंत यमगर ,गोविंद यमगर, ग्राम पंचायत सदस्य दीपक देशमुख,किरण देशमुख,धनंजय कांबळे,जगू यमगर, अण्णा पॅशन,एन डी सोंन्नर ,सर्जेराव घुटुगडे, नाना पावणे, साहेबराव पावणे, शामराव पुकळे, विलास बारवकर,नाथा पावणे,दिलीप पुकळे, उत्तमराव बुरुंगले, तात्यासाहेब बुरुंगले,संभाजी यमगर, समाधान चौगुले, गोविंद यमगर, सरपंच मोहन पडळकर, बाबा कोळपे,लक्ष्मण सरगर ,विठोबा पुकळे, घमाआबा पुकळे,सुनील वाघमारे,क्रांतिसिंह धेंडे , गणेश मंडले, संजय मंडले बाळू गुरव, यांचे योगदान मौल्यवान ठरले.







