शिरपूर तालुका/धुळे जिल्हा ग्रंथालय संघाकडून आ.काशिराम पावरा यांना ग्रंथालयांच्या विविध मागण्याबाबत निवेदन
शिरपूर – शिरपूर तालुका व धुळे जिल्हा ग्रंथालय संघाकडून आमदार श्री.काशिराम पावरा यांना ग्रंथालयांच्या विविध मागण्यांबाबत शिरपूर येथे आमदार कार्यालयात धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक राजकिरण राजपूत,रामदास वाघ,तालुकाध्यक्ष श्रावण पाटील,डी.एल.राजपूत,एकनाथ जमादार,यशोधन वाघ,हर्षवर्धन वाघ,भटेसिंग चौधरी, संघटनेचे पदाधिकारी आदीचा उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदान वाढीसाठी तसेच कर्मचारी वेतनाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी आझाद मैदान मुंबई येथे होत असलेल्या धरणे आंदोलनास पाठींबा देण्यासाठी व सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या विविध मागण्यासाठी मागील दहा वर्षापासून आंदोलने,मोर्चा,निवेदने,धरणे या मार्गाने आम्ही पाठपुरावा करीत आहोत
.परंतु प्रत्यक्षात आमची कोणतीही मागणी मागील दहा वर्षापासून मंजूर झालेली नाही.शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनावर अवलंबून राहून आम्ही आश्र्वस्त होतो.परंतु चालू अर्थसंकल्पात कोणतीही वाढीव तरतूद नसल्यामुळे आणि विधी मंडळात प्रश्नोत्तरातून शासनाची दिरंगाईची भूमिका लक्षात आल्यामुळे शासनाची भूमिका लक्ष वेधण्यासाठी दिनांक २१ मार्च २०२२ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.