आटपाडी ग्रामपंचायत चा कारभार सोशल मीडियावर ?
अकरा लाख की एक कोटी रुपये?
सरपंचाचे निवेदन,
आटपाडी; आटपाडी मध्ये सध्या सोशल मीडियावर वर रोड संदर्भात वाद रंगला असून आरोप / प्रत्यारोप होत असून या वादावर सरपंच वृषाली पाटील यांनी निवेदन दिले असून ते पुरावा निशी दिले आहेत
आटपाडी एसटी स्टँड पासून मेन पेठेतून आटपाडी ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत MREGS कुशल मधुन सिमेंट रस्ता काम होणे संदर्भात आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी आटपाडी ग्रामपंचायतीला 22 मार्च 2022 रोजी पत्र पाठवून संबंधित कागदपत्रे पंचायत समितीला जमा करणेबाबत कळवले होते.
गटविकास अधिकारी आटपाडी यांच्या पत्रामुळे विशेष म्हणजे त्याच दिवशी 22 मार्च 2022 रोजीच आटपाडी ग्रामपंचायतीने संबंधित सर्व कागदपत्रे आटपाडी पंचायत समितीला जमा केली आहेत त्याचा पुरावा सोबत जोडलेला आहे, अशाप्रकारचे वस्तुस्थिती असताना राजकीय द्वेषापोटी बदनामी करणेकामी काही जण विनाकरण आटपाडी ग्रामपंचायतीने कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत आहेत अशा प्रकारच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आटपाडी ची जनता खूप हुशार आहे. नक्कीच सदरच्या पुरावा पाहून लोक खरे कोण व खोटे कोण ठरवतील यात शंका नाही.
आटपाडी बाजारपेठेतील मुख्य रस्ता हा सिमेंटचा अगर डांबरी रस्ता व्हावा ही आम आदमीची सर्वांचीच इच्छा होती व आहे.
सदरचा रस्ता हा लवकर व्हावा म्हणुन 22 मार्च रोजी वरिष्ठांकडून ग्रामपंचायतीला पत्र आले व त्याच दिवशी आटपाडी ग्रामपंचायतीच्या कार्यतत्पर लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी 22 मार्च रोजीच संबंधित सर्व कागदपत्रे तयार करून पंचायत समितीकडे जमा केली आहेत.
मात्र आटपाडी तालुक्यातील काही राजकीय मंडळी सदर रस्त्याचे श्रेय घेऊ पाहत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी आटपाडी ग्रामपंचायत विरुद्ध खोट्या बातम्या शेअर करून आटपाडी ग्रामपंचायत ला दोषी ठरवण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत.
परंतु सदरची पोस्ट शेअर केल्यामुळे दूध का दूध और पानी का पानी अशाप्रकारचा भांडाफोड विरोधकांचा या पोस्ट मुळे झाला आहे.
.







