उत्तम बालटे यांना सावित्रीबाई फुले समाज भूषण राज्य स्तरीय पुरस्कार
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा
आम अनिलभाऊ बाबर,आम गोपीचंद पडळकर, आम जयकुमार गोरे यांच्या कडून शुभेच्छा
आटपाडी येथील समाजसेवक उत्तम बालटे यांना सावित्रीबाई फुले समाज भूषण राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
उत्तम बालटे यांचा आमदारअनिल भाऊ बाबर, आमदारगोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला
आटपाडी येथील भ्रष्टाचार निर्मूलन समिती शासकीय सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उत्तम बालटे यांना त्यांच्या कामांची दखल घेऊन त्यांना मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने सामाजिक क्षेत्रातील समाजभुषण पुरस्काराने सातारा येथे राज्यस्तरीय संमेलना मध्ये सन्मानित करण्यात आले..
सातारा येथील कवयित्री हेमा जाधव यांच्या ‘आई’ कवितासंग्रहच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर , कऱ्हाड येथील ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव, साहित्य मेळाव्यास चित्रपट निर्माते दिग्दर्शक गणेश शिंदे, कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, विश्वास नेरकर, ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, सुनील काटकर, आकाशवाणी विभागाच्या सोनाली बंड, अर्चना पवार, सुरेखा भालेराव, उस्मानाबादचे सिद्धेश्वर जंग ,बीडचे संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्यानंतर आटपाडीत उत्तम बालटे यांचे जंगी स्वागत करण्यात आले,
आमदार अनिल भाऊ बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माण चे आमदार जयकुमार गोरे, सांगली बॅकेचे संचालक तानाजीराव पाटील , जिल्हा परिषद सदस्य अरूण बालटे, जयवंत सरगर, अॅड धनंजय पाटील, दत्ता पाटील, अनिल शेठ पाटील, संतोष पुजारी, शिक्षक बॅकेचे यु. टी. जाधव , प्रभाकर पुजारी, बजरंग फडतरे, राजेश सातारकर,पिनू पंच, रावसाहेब सागर, नानासो माळी, दिलिप माळी, सेनेचे साहेबराव पाटील, प्रशांत माळी, सुधाकर जाधव,अनिल सुर्यवंशी, सिनेअभिनेते विजय देवकर,अमोल माळी,मनोज नांगरे यांच्या हस्ते बालटे यांचा सन्मान करण्यात आला.







