अशोक मोटे सर यांचे शैक्षणिक व सामाजिक काम आदर्शवत — आमदार अनिल (भाऊ) बाबर .
निंबवडे येथे जिल्हा परिषद प्राथ.शाळा नं.2 चे मुख्याध्यापक अशोक काशिनाथ मोटे गुरुजी यांचा सेवानिवृत्त गौरव समारंभ काल पार पडला.
या कार्यक्रमाला आमदार अनिल भाऊ बाबर ,आमदार गोपीचंद पडळकर ,संचालक तानाजीराव पाटील , सरपंच नंदाताई देठे , बाळासाहेब मोटे, माजी सरपंच धुळादादा देवडकर , मारुती पिंजारी , आप्पा पाटील,.भीमराव देवडकर, शिक्षक नेते जगन्नाथ कोळपे, शिक्षक बँकेचे चेअरमन यु. टी.जाधव दिघंचीचे सरपंच अमोलदादा मोरे ,तालुका प्रमुख साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सेवानिवृत्त गौरव सत्कार समारंभ जि.प.प्राथ.शाळा नं. 1 व 2 निंबवडे या शाळेने आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षिका , ग्रामस्थ , विद्यार्थी उपस्थित होते.
अशोक मोटे गुरुजीनी आपले शैक्षणिक कार्य करून गावातील अनेक विद्यार्थी घडवले. सेवा गौरव सत्काराच्या कार्यक्रमच्या निमित्ताने सायं. जल्लोष बालचमूंचा, अाविष्कार कलागुणांचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा औंधकर व महेश इंगवले यांनी केले आणि शेवटी आभार बापूसो औंधकर यांनी मानले.







