• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

स्नेहबंधाच्या पडल्या गाठी,भेटीत तृप्तता मोठी!
झरे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

माणगंगा by माणगंगा
May 15, 2022
in सांगली
0
स्नेहबंधाच्या पडल्या गाठी,भेटीत तृप्तता मोठी!झरे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

स्नेहबंधाच्या पडल्या गाठी,भेटीत तृप्तता मोठी!
झरे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

आटपाडी


झरे येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सन १९९२-९३ सालच्या व कॉलेजच्या पहिल्या एच.एस.सी.बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.मराठी विषयाचे प्राध्यापक व जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे चेअरमन प्रा.साहेबराव चवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


यावेळी बोलताना ते म्हणाले,मित्र चांगला लाभल्यानंतर जीवनातील सर्व दुःखे सुसह्य होतात.देव,भाव,गाव यांच्याकडून अपेक्षा करू नये.समाधान आनंद घेण्यात असते, ते असेल तर काही अडचण येत नाही.आनंद हा दुसऱ्याला सांगितला की दुणावतो आणि दुःख हे दुसऱ्याला सांगितले की उणावते.काळ बदलला आहे, आताचा काळ सुखाचा आला आहे.वाममार्गाने जगण्याचे मार्ग नव्याने निघाले आहेत,ते अवलंबू नका.विद्यार्थ्यांनी फार जिवापाड आदर केला.मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अतिशय क्लेशदायक असतो.सग्या-सोयऱ्यांपेक्षा मित्रवर्ग अडचणीच्या काळात उपयोगाला येतो.त्यांनी यावेळी विविध कविता सादर केल्या.


माजी मुख्याध्यापक व इंग्रजी विषयाचे शिक्षक दस्तगीर शिकलगार म्हणाले, त्याकाळी प्रत्येक वर्षी धडपडत शिकवले.पूर्वी इंग्रजी शिक्षणाची अवस्था वेगळी होती.आता शिक्षणामध्ये बदल झालेला आहे.त्यावेळी आम्ही तुमचे प्रौढ साथीदार होतो. शिक्षणाचे कधीही नुकसान होत नाही.व्यक्ती सतत शिकत असतो.मुले आपणाला पैसे मागत नाहीत, ही फार मोठी गोष्ट आहे,स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचे लक्षण आहे. गरिबीत दिवस काढल्यामुळे जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना मदत केली.आमचे ‘गुडविल’ कायम ठेवले. ज्या त्या काळात आलेली गोष्ट स्वीकारावी.मुलांना प्रेम,स्वातंत्र्य द्यावे. त्याच्यापुढे कृतीयुक्त चांगला आदर्श ठेवावा,अशा पद्धतीने आपली पिढी घडवा.शाळा टिकविण्याचे काम मोठ्या कष्टाने केले आहे.संवादाने चांगले काम होते.


माजी मुख्याध्यापक व भूगोलाचे शिक्षक सुरेश कदम म्हणाले,आपण आनंदासाठी जगले पाहिजे.एकमेकांना सहाय्य करुया.आपला दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा.शेती क्षेत्रात दृष्टी ठेवून व्यावसायिक शेतीमध्ये उतरावे.


माजी मुख्याध्यापक व राज्यशास्त्राचे शिक्षक पी.एन.कुंभार म्हणाले, प्रेम,शक्ती,बुद्धी या सर्व गोष्टी पणाला लावल्या पाहिजेत.जीवनात नेहमी आनंद द्यायचा-घ्यायचा असतो.सत्य हे कटू असते.काळ कोणासाठी थांबत नाही. सतत परिवर्तन होत असते.काळ बदलला,शिक्षण बदलले. मनोभावाने केलेल्या कामात यश येते.लोकशाहीची मूल्यता मनामध्ये असले पाहिजे.शेतीत काम करणारे खऱ्या अर्थाने तुम्ही भूमिपुत्र आहात.गुरुभेटीची उत्सुकता होती.त्यामुळे हा मेळावा यशस्वी केला.


सांगली जिल्हा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक हैबतराव पावणे म्हणाले,जुने अनुभव संकटकाळी मदतीला येतात.प्रत्येक मानवाच्या जीवनाला आकार देण्याचे काम गुरूवर्य करतात.जीवनात पैसा साधन म्हणून उपयोगाला येतो,मात्र अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करणारे मित्र जीवाभावाचे ठरतात.जीवनात माणूस कितीही मोठा झाला, तरी तो आई-वडील व गुरू यांच्या नजरेत लहानच असतो.जीवन जगत असताना आपल्याला सर्व स्तरातील मित्र असावेत.
माजी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.


मुख्याध्यापक देवानंद घोणते यांनी प्रास्ताविक केले.ते म्हणाले,शिक्षकांच्या वाक्याने प्रेरणा मिळते व आयुष्याची जडणघडण होते.
बापूसाहेब वाघमारे म्हणाले, प्राध्यापकांनी प्रेम दिले, जीवनात उभा राहण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.यशस्वी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत केली.
संजय घोणते म्हणाले,खडतर परिश्रम करुन जीवन उभे केले.निसर्गाने सर्व कामे माझ्याकडून करुन घेतली.
पत्रकार सदाशिवराव पुतळे म्हणाले,स्वत:वर वाईट प्रसंग येतो, त्यावेळेस नातेवाईक, मित्रमंडळी आठवतात.
अंगणवाडी सेविका सौ.उमल खोत म्हणाल्या,शिक्षण पूर्ण करून यशस्वी वाटचाल केली.सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करतो, समाधान वाटते.
दिलीप वाघमारे म्हणाले,प्रबळ इच्छा असायची की चांगले काम मिळावे.नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले.जीवन वाटेवर चालायचे थांबलो नाही.कला ही माझी जीवनाची सावली आहे.सर्वानाच यश प्राप्त होते असे नाही. मी समाधानी आहे.मुलींना शिकवले हेच माझे वैभव आहे.
लखन पडळकर म्हणाले, माझा विद्यार्थी शकला नाही तरी चालेल पण तोचा विमानाने उभा राहिला पाहिजे या शिक्षकांच्या शब्दावर उभे राहिलो.
यावेळी नारायण मोटे,प्रकाश कदम,दुर्योधन गोरड ,सौ.वर्षा राजमाने, विष्णू गोरड,प्रवीण पावणे,आनंद यादव, राजेंद्र पाटील,तानाजी गोरड यांनी आपला परिचय करून दिला.बापूसाहेब वाघमारे यांनी आभार मानले.

Views: 365
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
*धनगर समाजावर सातत्याने अन्याय ==प्रवीण काकडे

*धनगर समाजावर सातत्याने अन्याय ==प्रवीण काकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)