मेंढपाळांनी मेंढवाड्यावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करावी…!!
मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन थोरात यांचे आवाहन..
लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढवाड्यावर साजरी करण्यात यावी आशा सूचना मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन थोरात यांनी बैठकीत दिल्या आहेत
सदर बैठकीस मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश मुढे यांनी मेंढवाड्यावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले व अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य विशद केले त्याचबरोबर इथून पुढे अहिल्यादेवी यांचे कार्य जनमाणसात रूढ व्हावे असे मत व्यक्त केले
सदर बैठकीस मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय संघटक राहुल हजारे ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा चंद्रकांत हुलगे, नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर शेटे, सोलापूर जिल्हा सचिव विश्वास काळेबाग, माळशिरस तालुकाध्यक्ष संतोष माने, खटाव तालुकाध्यक्ष रमेश तांबे,जत तालुकाध्यक्ष महेश हावगोंडी,संगमनेर तालुकाध्यक्ष साईनाथ लबडे, नाशिक मेंढपाळ प्रतिनिधी समाधान कंडालकर आदि मेंढपाळ आर्मी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन थोरात म्हणाले पशुपालक, मेंढपाळ, पशुपक्षी यांच्या अन्न धान्याची सोय अहिल्यादेवी होळकर यांनी त्याकाळी केली होती अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य खुप मोठ्ठे आहे व ते जगभर वंदनिय आहेत. ज्यांना जमेल त्या स्थितीत मेंढवाड्यावरून अहिल्यादेवी होळकर यांना हात जोडुन अभिवादन करावे असे आवाहन यावेळी केली
यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त करत अहिल्या देवी होळकर जयंती चे मेंढवाड्यावर जंगी नियोजन करणार असल्याचे मत व्यक्त केले, तसेच संघटनेस मिळणारा वाढता पाठिंबा पाहता संघटनेचे कार्यक्षेत्र(विस्तार) वाढवण्याची गरज असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी अर्जुन थोरात यांच्याकडे व्यक्त केले
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत हुलगे अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य विशद केले व लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या…







