पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माणगंगा न्यूज पोर्टल जत:
-जत तालुक्यातील हिवरे गावा मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती साजरी करण्यात आली.जयंती निमित्त दिवसभर विविध कार्यक्रम करण्यात आली.सकाळी ८.३० वाजता मुर्ती पुजन तर ९.३० वाजता भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत पार पडल्या बक्षीस बैलगाडी आदत गट प्रथम क्रमांक-सरगर, व्दितीय क्रमांक-संतोष खरात, तृतीय क्रमांक-विठ्ठल कुंभारे.ब गट प्रथम क्रमांक-प्रशांत घागरे, व्दितीय क्रमांक-रवी कोळेकर, तृतीय क्रमांक-दिनेश गडदे.घोडागाडी बक्षीस प्रथम क्रमांक-सागर भोसले, व्दितीय क्रमांक-विशाल घाटे, तृतीय क्रमांक-बबलू व्हरगर.नतर सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम धनगरी ओव्या व गावातील साफसफाई, वृक्षारोपन,स्मशान भूमी मध्ये पाण्याची टाकी बसवणे.दुपारी ३ ते ४ भोजनाचा कार्यक्रम व ४ ते ६ भव्य कुस्ती चा मंडळातर्फे ५१००० रुपये तर वैयक्तीक कुस्तीचे नियोजन केले होते.संध्याकाळी ७ वाजता भव्य लहान व मोठ्या गटाचा रेकॉर्ड डान्स स्पर्धा अहिल्यादेवी प्रतिष्ठान हिवरे यांचा वतीनि साजर करण्यात आला.







