• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनाच्या निमित्ताने चौफेर विकास, उपक्रमांचा जागर करा .सादिक खाटीक यांचे आवाहन .

माणगंगा by माणगंगा
June 5, 2022
in सांगली
0
राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनाच्या निमित्ताने चौफेर विकास, उपक्रमांचा जागर करा .सादिक खाटीक यांचे आवाहन .

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनाच्या निमित्ताने चौफेर विकास, उपक्रमांचा जागर करा .

सादिक खाटीक यांचे आवाहन .


आटपाडी दि . ४ (प्रतिनिधी )


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौफेर विकासाच्या उपक्रमांचा सर्वांनी लक्षवेधी जागर करून जनतेला जागृत करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना . जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी” या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे सादिक खाटीक यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या सहाव्या आणि आटपाडीतील पाचव्या गाव – प्रभाग भेटीच्या बैठकीवेळी सादिक खाटीक बोलत होते .


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली राज्यभर राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनाच्या दि . १० जून ते १६ जुन पर्यतच्या पुर्ण उपक्रमाची माहीती सादिक खाटीक यांनी यावेळी दिले .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रातल्या माजी मंत्री महोदयांनी आणि राज्यातल्या मागील आघाडी सरकार मधील राष्ट्रवादीच्या मंत्रीमहोदयांनी तसेच आताचा महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री महोदयांनी राज्याच्या विकासासाठी टाकलेली पावले, घेतलेले निर्णय, राबविलेले उपक्रम, केलेली आंदोलने या सर्वांचा जागर करून प्रत्येक कार्यकर्त्याने आपला घरावर राष्ट्रवादीचा झेंडा, दारावर राष्ट्रवादीचे स्टीकर लावून या कालावधीत तळागाळापर्यत पक्षाचा उपक्रम पोहचवावा . असा अनेक कार्यक्रमांचा प्रदेश हून उपक्रम आल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .


ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका व्हाव्यात यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न यशस्वी होतील अशी आशा व्यक्त करून सादिक खाटीक यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहीजे . या राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेला देशाने साथ द्यावी . असे आवाहन केले .


आटपाडीतल्या ३ वर्षापासून रेंगाळलेल्या १३ कोटीच्या गदिमा नाट्यगृहाचा तसेच वर्षापासून पुढील हालचाल ठप्प झालेल्या पुण्यातील गदिमा स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी राज्य सरकारने आणि पुणे महानगरपालिकेने आग्रही भूमिका घ्यावी . तसेच जन्मशताब्दी वर्ष सुरु असलेल्या शंकरराव खरात यांच्या आटपाडीतल्या स्मारकासाठी राज्य शासनाने १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा .अशी मागणी ही सादिक खाटीक यांनी केली .


महिला युवक, युवती, कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी राजारामबापू पाटील उद्योग समुहातील विविध उदयोग आटपाडीत सुरु व्हावेत . यासाठी ना . जयंतराव पाटील साहेबांकडे आपण जोरदार प्रयत्न करणार आहोत अशी भावना ही सादिक खाटीक यांनी बोलुन दाखविली .
महिला, युवक, युवती आणि अकुशल कामगार, मजुर यांच्या उपजिवीकेसाठी विविध महिला उद्योग, लिज्जत पापड युनिट , शेतमालावर प्रक्रिया करणारे उदयोग, गारमेंट, वेगवेगळी कारखानदारी आटपाडी येथे निर्माण व्हावी, या मागण्या यावेळी पुन्हा उपस्थित करण्यात आल्या .

आटपाडी खादी भांडार येथील ग्रामोद्योग मोठ्या प्रमाणावर सुरु व्हावा . यावरही भाष्य केले गेले .
आटपाडी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून ३ दिवसातून एकदा प्रत्येक कुटुंबाला पुरेसे पाणी मिळावे अशी मागणी श्रीमती तायराबी खाटीक यांनी तर आटपाडीतील शंकरराव हाके यांचे घर राजेंद्र पांडुरंग जाधव यांचे घरादरम्यानची गटर बंदिस्त करून या बोळात प्लेवीन ब्लॉक द्वारे रस्ता बनवला जावा आणि बोळात लाईट ची व्यवस्था केली जावी अशी मागणी श्रीमती शाबेरा आब्बास बेपारी यांनी केली. तर श्रीमती सविता उमेश लांडगे यांनी, पती निधना नंतरच्या चार वर्षात सुरु असलेल्या होरपळीची व्यथा मांडली . १६ – १७ वर्षाच्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दोन मुली, दहा वर्षाचा शाळा शिकणारा मुलगा या समवेत जगण्याचा संघर्ष यातनादायी असल्याचे सांगीतले . जमीन जुमला नाही , घरात कमवते कोणी नाही . सासू,सासरे,दीर,जावा, त्यांची मुले यांच्या समवेत छोट्याशा घरात सर्वांचीच दयनीय अवस्था होत असून माझ्या सर्वच बाजुंनी उघड्या पडलेल्या परिवाराला एक घरकुल आणि मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य अपेक्षित असल्याचे श्रीमती सविता उमेश लांडगे यांनी सांगीतले .


यावेळी सामाजीक कार्यकर्ते दिलावर शेख, अनिस खाटीक, जितेंद्र साळुंखे – पाटील , इन्नुस खाटीक, रियाज शेख, योगेश ताटपुजे,चंद्रकांत सोन्नुर, पांडुरंग पाटील, विजयराज ऐवळे, सोमनाथ ढोबळे, कुर्बानहुसेन खाटीक, कलंदरबाबा खाटीक, नदिम खाटीक, सौ. रेश्मा बंडगर, सौ . मुमताज खाटीक, सौ शमा खाटीक, सौ . हसिना शेख, श्रीमती पारूमावशी जाधव, श्रीमती शाबेरा बेपारी, श्रीमती बेबी शेख, श्रीमती रशिदा खाटीक, सौ . राबीयाँबसरी खाटीक, सौ .फरहीन खाटीक, सौ . इशरतजहाँ खाटीक, श्रीमती कोंदनबी शेख, श्रीमती तायराबी खाटीक, श्रीमती नौसर शेख, सौ . रशिदा शेख, श्रीमती सविता लांडगे, धनश्री लांडगे, सौ. रुक्साना शिकलगार, इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
प्रारंभी रियाज शेख यांनी स्वागत केले तर आभार दिलावर शेख यांनी मानले .

Views: 195
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
उपाळेवांगीत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांचे आगमन.

उपाळेवांगीत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांचे आगमन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)