विभुतवाडी वादळाचा तडाखा
घराचे पत्रे उडाले अनेक झाडे जमीनदोस्त
सरपंचासह पत्नी व मुलगी जखमी






विभूतवाडी ता. आटपाडी येथे दुपारनंतर चारच्या आसपास सुसाट वारा सुटला व मोठं वादळ आलं या वादळामध्ये दीडशे ते दोनशे झाडे जमीनदोस्त झाली आहेत .तर अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत सार्वजनीक शौचालयाचे पत्रे उडाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,काही ठिकाणी जनावरांच्या अंगावर पत्रे उडून पडले आहेत जनावरे जखमी झाले आहेत. पाऊस किरकोळ प्रमाणात होता परंतु वारा मोठ्या प्रमाणात असल्याने भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये सरपंच चंद्रकांत पावणे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाल्या आहेत







