धावडवाडी येथे इंजिनियर साहेब व पीएसआय साहेब यांच्या सेवानिवृत्ती झाले बदल सत्कार करण्यात आला.
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-
सर्वांना परिचित असणारे या गावचे सुपुत्र व धावडवाडी गावचे पहिले इंजिनियर सन्माननीय खुदबुद्दीन शेख साहेब यांनी ३८ वर्ष सेवा केली सांगली पाठबंधाऱ्यातून उप विभागीय वर्ग १ या पदावर होतेआणि जांभळवाडी गावचे पहिले फौजदार व पीएसआय सन्माननीय रावसाहेब रानगर साहेव यांनी ३८ वर्ष सेवा केली हे दोन सत्कार सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाला आवर्जून आलेले आमदार विक्रम दादा सावंत यांचे सुपुत्र धिरज भैय्या सावंत,जत तालुका कॉग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे,माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडग,माजी पोलीस पाटील महादेव दाईगडे,हिवरे सोसायटी चेअरमन सिद्राम शिंदे,कोसारीचे माजी सरपंच उमेश महारणुर,चेअरमन किसन टेंगले,पंचायत समिती सदस्य नाथा पाटील,कुंभारी चे पक्का मालक व सर्व मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी या दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







