आटपाडीत शिक्षक बँक निवडणूकीचा झंजावती प्रचाराचा शुभारंभ
आटपाडी प्रतिनिधी


सांगली जिल्हा शिक्षक बँक निवडणूकीचा शुभारंभ खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिरामध्ये झाला .पुरोगामी सेवा मंडळ सांगली प्रणीत सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणूकीचे तालुका उमेदवार हैबतराव पा वणे यांच्या प्रचार शुभारंभ निमित्त तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी यांच्या अलोट व उत्स्फुर्त गर्दीमध्ये पवित्र अशा खरसुंडी नाथ जोगेश्वरी घोडे खूर नगरीमध्ये तमाम शिक्षक समिती सैनिक व महिला आघाडी तसेच कवठेमंकाळ चे उमेदवार मनोज कोळेकर तासगाव चे उमेदवार श्रीकांत शिंदे ,कृष्णा पोळ यांच्या समवेत प्रचाराचा शुभारंभ झाला
श्रीफळ वाढवून कार्यक्रम संपन्न करते वेळीस शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन यु टी जाधव ,माजी चेअरमन शिवाजीराजे पवार, शशिकांत बजबळे, माजी संचालक सिद्धार्थ कटरे,धनाजी देठे, सहकारी रुग्णालयाचे संचालक बाबासाहेब शेख, श्रीकांत राजे कुंभार , तालुकाध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे व उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते पुरोगामी सेवा मंडळ, शिक्षक भारती , खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या पॅनेलला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे अभिवचन सर्वांनी व्यक्त केले .
फोटो – प्रचाराचा शुभारंभ करताना उमेदवार हैबतराव पावणे, यु.टी.जाधव व मान्यवर







