-: साहित्य संमेलन आढावा बैठक :-
आपणास कळविण्यात येते की, डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन आटपाडी ची आढावा बैठक रविवारी दिनांक १९/०६/२०२२ रोजी दुपारी ठीक २ वाजता संमेलनाचे स्वागतअध्यक्ष माजी आमदार श्री राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी आटपाडी येथे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेणे बाबत बैठक आयोजित करणेत आली आहे.
तरी सदरची बैठक अत्यंत महत्वाची आहे, तरी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, साहित्यप्रेमी, शिक्षक, पदाधिकारी पत्रकार व बंधू भगिनींनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती आहे, कळावे.







