दहावीच्या परिक्षेत बोपगाव हायस्कुलचा शंभर टक्के निकाल
पुणे ( दत्ताञय फडतरे )
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील श्री सदगुरु कानिफनाथ माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे .दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.यंदाच्या निकालात श्री सद्गुरू कानिफनाथ माध्यमिक विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. मुलींमधुन सिद्धी भाऊसाहेब फडतरे 93.00% , तर सिद्धी गिरीष फडतरे 92.80% टक्के मिळवुन दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली . तिसर्या क्रमांकाचे यश मिळवत , मुलांमधुन अभिषेक बापू फडतरे 91.20% टक्के मिळवत पहिला आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे . शंभर टक्के निकालामुळे ग्रामस्थांकडुन विद्यालयातील शिक्षक वर्गाचे कौतुक होत आहे.







