शिक्षक बँकेच्या निवडणूकच्या प्रचारात विद्यार्थ्यांचे काय???
शिक्षक प्रचारात ,विध्यार्थी मात्र वाऱ्यावर
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक येत्या 3 तारखेला घोषित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने गेली पंधरा दिवसापासून शिक्षक प्रचाराच्या कामाला लागले आहेत, परंतु दिनांक 15 जून पासून शाळा सुरू झाल्या खऱ्या, विद्यार्थीही शाळेत आले आहेत. परंतु शिक्षक कुठे आहेत,
शिक्षक निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. आणि प्रशासन मात्र सुस्त आहे .
मुळातच जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो दृष्टिकोन बदलावा यासाठी शासनाने मॉडेल स्कूल ची निर्मिती केली आहे. या मॉडेल स्कूल मुळे अनेक विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होत आहेत.
परंतु या बँक निवडणुकीच्या प्रचारात अनेक शिक्षक शाळेत नसतात, याबाबत गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, किती शिक्षक रजेवर आहेत हे मी सोमवारी माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी सांगितले.
जवळ जवळ सर्व शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एक महिन्यापासून सक्रिय आहेत, शिक्षक प्रचारामध्ये उतरलेले आहेत . पॅनल ची तयारी करणे, निवडणुकीची तयारी करणे, मतदारांच्या गाठीभेटी घेणे, मतदारांसोबत बैठका सहभाग घेणे यामध्ये एक महिन्यापासून शिक्षक मग्न आहेत.
आशा परस्थिती मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा काळ हा मुलांना शाळेत उपस्थित ठेवणे, त्यांना शाळेची आवड निर्माण करणे या गोष्टींसाठी महत्त्वाचा असतो आणि शिक्षक जर शाळेत उपस्थित नसतील, तर मुले शाळेत येणार कशी ? आणि त्यांचा गुणवत्ता विकास होणार कसा ? असा सूर पालकांमधून येत आहे. किती शिक्षक शाळेत हजर आहेत व किती रजेवर आहेत की अनुपस्थित आहेत याची कुठलीही कल्पना प्रशासनाला नाही. असा अनागोंदी कारभार शिक्षण विभागाचा दिसून येत आहे. यात वरिष्ठ प्रशासन लक्ष घालणार का ? असा सूर पालकांमधून येत आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. याबाबत किती शिक्षकांनी रजा घेतली याची माहिती खुद्द शिक्षण अधिकारी यांना ही नाही ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे







