सभासदांचे हित व बँकेचे संवर्धन यासाठीच काम करणार….. शरद चव्हाण
शिक्षक बँकेचे उमेदवार शरद चव्हाण यांना वाढत पाठिंबा
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे .परंतु या निवडणुकीत ‘ आपण दिलेला शब्द पाळणार ‘अर्थात पहिले पाढे पंचावन्न याची मुळीच प्रचिती यापुढे सभासदांना येणार नाही. असे स्पष्ट प्रतिपादन आटपाडी सर्वसाधारण गटाचे उमेदवार शरद चव्हाण यांनी केले आहे.
आताची होणारी निवडणूक सभासदांनी स्वतःहून आपल्या हाती घेतली आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन निश्चित आहे . या परिवर्तनाच्या लाटेत सभासद बहुसंख्य संख्येने सामील होऊन स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाला उदंड असा प्रतिसाद देत भरघोस मताधिक्य देऊन निवडून देतील असा ठाम विश्वास शरद चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवला.
तसेच कोरोना महामारीमुळे सत्ताधाऱ्यांना जो अतिरिक्त कारभार करण्याची लाट लागलेली होती, त्याचा त्यांना सभासदांच्या हितासाठी उपयोग करता आला असता, परंतु त्यांनी स्वतःची घरे भरण्याचे काम या अतिरिक्त वर्षांमध्ये केले आहे. त्यामुळे स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या लाटेमध्ये सर्व सत्ताधारी मंडळ वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत.
तसेच स्वाभिमानी शिक्षक मंडळ सत्तेवर येताच करणाऱ्या विविध विकास कामांची ब्लू प्रिंट त्यांनी यावेळी मांडली यामध्ये संचालक मंडळाच्या पहिल्याच मीटिंगमध्ये 15 लाखापर्यंत कर्ज 9 टक्के व्याजदराने दिले जाईल, सत्ताधाऱ्या पेक्षा जास्त लाभांश दिला जाईल, मयत निष्कर्जी सभासदांना वीस लाखापर्यंत ची मदत केली जाईल, तसेच दर महिन्याला शिक्षकांनी हप्ते भरून सुद्धा बँकेच्या उशिरा हप्ता कट करण्यामुळे शिक्षकांची खराब होणारी आर्थिक पत Auto Debit लावून कशी सुधारली जाईल यासाठी ठोस कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट मत शरद चव्हाण यांनी मांडले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाचे अध्यक्ष असिफ मुजावर सरचिटणीस श्रीकांत मोरे, प्राथमिक शिक्षक संघ शि.द.पाटील गटाचे अध्यक्ष यशवंत आप्पा गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष रसिक सपाटे , सुनील गायकवाड , कोषाध्यक्ष नितीन वाघमारे, माजी अध्यक्ष जीवन सावंत , अध्यक्ष हणमंतराव गायकवाड,जिल्हा नेते शहाजी वाक्षे,जिल्हा प्रवक्ते नारायण कदम , जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गळवे ,सरचिटणीस दीपक कबीर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे माजी अध्यक्ष रावसाहेब देवडकर,प्रसिध्दी प्रमुख अजिनाथ बुधावले , शिक्षक संघाचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत कडव, महेश गोंजारी,कवी रवींद्र भोसले , आदर्श शिक्षक भाऊसो सूर्यवंशी , आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते*







