सभासदांचे हित व बँकेचे स्थैर्य यासाठीच प्रामाणिकपणे काम करणार – हैबतराव पावणे
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात शिक्षक बँक निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. यानिमित्ताने सभासदासमोर बोलताना शिक्षक बँकेचे उमेदवार हैबतराव पावणे यांनी सभासदांना आश्वासित केले, पुरोगामी सेवा मंडळ सत्तेत येताच सर्वच कर्जाचे व्याजदर 1 अंकी करणार, तसेच मयत सभासदास संपूर्ण कर्जमाफी, व दोन अंकी लाभांश देण्याचा प्रयत्न करणार.
तसेच शिक्षकांच्या साठी मेडिक्लेम योजना राबवणार, डी सी पी एस बांधवांसाठी भरीव आर्थिक तरतूद करणार, तर शिक्षकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार, शुभमंगल योजना आणणार, यासारख्या अनेक सभासद हिताच्या योजना राबवणार असल्याचे हैबतराव पावणे यांनी सांगितले व तसे वाचन दिले.
यावेळी अध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे, दिपक कुंभार ,भास्करराव डिगोळे ,यशवंत मोरे ,विठ्ठलपंत माळी, दिनेश माने ,हरि जावीर ,बाळासाहेब साळुंखे, रवींद्र सावंत ,सुभाष सुतार ,सचिन त्रिगुणे, सचिन सासणे, संतोष पिसे, भिमराव शिंदे आदी शिक्षक बांधव उपस्थित होते.
फोटो – हैबतराव पावणे







