कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथे भूमि अभिलेख विभाग जत चा वतीने ड्रोनद्वारे गावठाण भूम आपन मोजणीचा शुभारंभ…
माणगंगा न्यूज पोर्टल कोसारी:-कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथे भुमिअभिलेख विभागाच्या वतीने ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणीचा शुभारंभ करण्यात आला उपसंचालक भूमी अभिलेख पुण्याचे माननीय किशोर दौरे तसेच जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख सांगलीचे किशोर जाधव यांच्या प्रयत्नाने काल कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथे ड्रोनद्वारे भूमी अभिलेख विभागाच्या वतीने भूमापन मोजणीचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी जत चे तहसीलदार जीवन बनसोडे गट विकास अधिकारी दिनकर खरात अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट प्रभाकर भाऊ जाधव जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रकाश भोसले जत येथील भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी माननीय सुनील धुल्हाळे कोसरीचे सरपंच माननीय तानाजी दिसले उपसरपंच बाळासाहेब पवार शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजीराव पडळकर तसेच कोसारे सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन किसन टेंगले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या भूमी अभिलेख विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे गावठाण आपण मोजणीचा शुभारंभ श्रीफळ वाढून करण्यात आला
यावेळी गावातील गाव कामगार तलाठी माननीय राहुल कोळी ग्रामसेवक श्री कुंभार,श्री महानोर,नानासाहेब लिगाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला या ड्रोनद्वारे मिळकतीचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील व्यक्तीचे नेमके क्षेत्र माहित होईल मालकी हक्काची मुलाखत पत्रिका तयार होईल गावातील रस्ते खुल्या जागा नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल यासह अनेक फायदे या निमित्ताने होणार आहेत या ड्रोनद्वारे होणाऱ्या या भूमापन मोजणीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.







