सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी चे 2022-2023 चे मिल रोलर पुजन संपन्न…..
/पिलीव प्रतिनिधी- विश्वजीत गोरड
गत हंगामात विक्रमी नऊ लाख मेट्रिक टन यशस्वी गाळपानंतर चालु 2022-2023 हंगामाची जोरदार तयारी सद्गुरु ने केली आहे. सभासद ऊस नोंदी,वाहन करार, कर्मचारी ट्रेनिंग याबाबी बारकाईने सद्गुरु चे कर्तव्यदक्ष चेअरमन शेषागिरी राव अंकल पाहत आहेत. प्रत्येक सभासदाचा परिपत्रकानुसार ऊस गाळप व्हावा व गत हंगामात जो थोडाफार त्रास सभासदांना झाला तो पुन्हा होऊन नये म्हणुन अगदी शिस्तबद्द पद्धतीने सुयोग्य नियोजन कारखाना व्यवस्थापन करत आहे. प्रत्येक शेतकर्याच्या ऊसाची नोंद वेळोवेळी घेतली पाहिजे म्हणुन शेती अधिकारी दक्ष आहेत.
कारखाना व मशिनरी साफ-सफाई अंतिम टप्प्यात आली असुन मिल रोलर चे पुजन चेअरमन शेषागिरी राव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी डे.जनरल मॅनेजर शहाजी पाटील,एच आर एडमिन सचिन खटके, केन मॅनेजर सुनिल सावंत, सिव्हील इंजिनियर अवधुत जमदाडे,शेती अधिकारी अतुल नाईकनवरे दत्ता क्षिरसागर,ऊस विकास अधिकारी सुरेश घाडगे, बिजनेस डेवलपमेंट मॅनेजर आण्णासाहेब शेंडे ,डिसलरी मॅनेजर लालासो पाटील व कारखाना कर्मचारी उपस्थित होते







