शिंदे व फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध जाहीर निषेध……
जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या जलसंपदा विभागाच्या 3 हजार कोटींच्या शेतकरी हिताच्या कामांना स्थगिती दिल्याबद्दल शिंदे- फडवणीस सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
जलसंपदा विभागाच्या 3 हजार कोटी कामांना शिंदे फडणीस सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अनेक क्षेत्र ओलिताखाली येण्याऐवजी ते कोरडवाहूच राहणार असल्याने यामुळे शेतकरी बांधवांचे बरेच नुकसान होणार आहे.
बरेच वर्षानंतर शेतकरी बांधवांचे स्वप्न पूर्णत्वास जाणार होते. त्याचा या सरकारने भंग करण्याचे काम केले आहे. शेतकरी बांधवांचे वतीने व आम्हा सर्व वंचित गावच्या वतीने शिंदे- फडणवीस सरकारचा जाहीर निषेध.
दुष्काळी भागाने आणखी किती दिवस दुष्काळाच्या यातना सहन करायच्या
दुष्काळी भागातील नागरिक पाणी नसल्याने उपजीविका भागवण्यासाठी स्थलांतर करीत असतात. माझी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अपुऱ्या असणाऱ्या योजनेसाठी निधी मंजूर केला होता .परंतु या शिंदे फडणवीस सरकारने तो निधी ती कामे रद्द केली आहेत .त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आणखी किती दिवस यातना सहन करायच्या असा गंभीर प्रश्न बनला आहे.
दुष्काळी भागात पाणी नसल्याने अनेक मेंढपाळ अनेक कुटुंब उपजीविका भागवण्यासाठी स्थलांतर करतात. व पावसाळ्यामध्ये पुन्हा गावाकडे येतात. अशा कुटुंबाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. कारण सहा महिने मुले शिक्षणासाठी कोणाजवळ ठेवायची ? मुलांना शिक्षण मिळत नाही. आणि या नूतन सरकारने निधी थांबून या गोरगरीब शेतकऱ्यांचे मुलांचे पाप डोक्यावर घेतले आहे.
अशा सरकारचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे







