• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी पशुवैद्यकीय विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा..
खाजगी डॉक्टरांची सेवा तेजीत

माणगंगा by माणगंगा
July 22, 2022
in सांगली
0
आटपाडी पशुवैद्यकीय विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा..खाजगी डॉक्टरांची सेवा तेजीत

आटपाडी पशुवैद्यकीय विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा..
खाजगी डॉक्टरांची सेवा तेजीत


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने खाजगी डॉक्टरांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. अनेक शेतकरी आपल्या गुराढोरांना ,मेंढ्यांच्या उपचारासाठी शासकीय डॉक्टरांची वाट पाहण्यापेक्षा खाजगी डॉक्टरकडून उपचार करून घेत आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी आहेत, किंवा नाहीत याचा फारसा कोणी विचार करीत नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाची सेवा असून तोटा आणि नसून खोळंबा अशी वस्तूस्थिती तालुक्यांमध्ये झाली आहे.

त्यामुळे सर्रास शेतकरी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या गुराढोरांना मेंढ्यांना खाजगी डॉक्टर कडूनच उपचार करून घेत आहेत . सध्या तालुक्यांमध्ये परिस्थिती सुरू आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी किंवा इतर कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या मीटिंग असो किंवा अन्य शासकीय कामा निमित्त ते बाहेर गेले असता दवाखाना बंदच राहत असतो .कारण अनेक पदे रिक्त असल्याने सरासरी दवाखाने बंदच असतात .त्यामुळे नागरिकांना आपल्या जनावरांना, गुराढोरांना खाजगी डॉक्टर कडूनच उपचार घ्यावा लागतो.

तालुक्यामध्ये एकूण 60 हजार पशुधन घटक आहेत. तर 5 हजार पशुधन घटकामागे एक दवाखाना हवा आहे. परंतु सध्या परिस्थितीमध्ये 8 दवाखाने आहेत, आणखी 4 दवाखानेची गरज आहे .त्यामध्ये शेटफळे, राजेवाडी ,पिंपरी खुर्द (आंबेवाडी) व घाणंद या ठिकाणी पाच वर्षापासून दवाखान्याची मागणी आहे. परंतु अद्याप मंजुरी मिळाली नाही. दवाखान्याची व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे 20 हजार पशुधन सेवे वंचित राहत आहेत.


कर्मचाऱ्यांची सध्याची परिस्थिती पशुधन विकास अधिकारी मंजूर पदे 7 रिक्त पदे 2,
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मंजूर पदे 1 ,
पशुधन पर्यवेक्षक मंजूर पदे 2,
ड्रेसर मंजूर पदे 6 रिक्त 2 ,
परिचर एकूण पदे 12 रिक्त 8


सध्याच्या परिस्थितीमध्ये अशी अवस्था पशुवैद्यकीय विभागाचे आहे.
रिक्त पदे असोत किंवा डॉक्टर गैरहजर असो, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अनेक वेळा पशुवैद्यकीय दवाखाने बंद अवस्थेतच असतत्. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरची मागणी करून जनावरांना उपचार घ्यावा लागत आहे.।


तसेच फिरते पशुवैद्यकीय पथक (मोबाईल व्हॅन )आहे. पण त्यावर तात्पुरता ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर पद रिक्त आहे. तरी तेथे कायमस्वरूपी ड्रायव्हर व डॉक्टर ची नेमणूक व्हावी .तसेच तालुक्यामध्ये लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय हवे आहे .सहाय्यक दर्जाचा अधिकारी नियुक्त होईल .एक्स-रे काढण्यासाठी सोपे होईल ,प्रयोगशाळा होईल जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी सोय आहे .परंतु प्रयोगशाळा व एक्स-रे काढण्याची सोय आटपाडी मध्ये नाही. तरी आटपाडी मध्ये सर्व चिकित्सालय व्हावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


जर शेतकऱ्यांच्या जनावरांना शासकीय सेवा वेळेत मिळाली तर त्यांचे पैसे बचत होतील .खाजगी डॉक्टर कडून उपचार घेतले असता शेतकऱ्यांचा खर्च वाढतोय .एक तर महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात जनावरांच्या औषधाच्या खर्च ,डॉक्टरांची फी याचा विचार केला तर जनावरे पाळणे सुद्धा मुश्किल झाले आहे. त्यासाठी शासकीय सेवा वेळेत मिळणे गरजेचे आहे.

चौकट – तालुक्यामध्ये एकूण 60 हजार पशुधन आहे. रिक्त पदे असल्याने 20 हजार पशुधनाला सेवा मिळू शकत नाही.
सध्या कार्यरत असणारे अधिकारी काही कामानिमित्त बाहेर गेले असता दवाखाना बंदच राहतो. त्यामुळे पशुधनाला सेवा मिळत नाही. त्य शेतकरी खाजगी डॉक्टर कडून जनावरांना उपचार करीत असतात त्यामुळे शासकीय सेवा असून तोटा आणि नसून खोळंबा अशी अवस्था आहे.
फोटो -आटपाडीतील पशुवैद्यकीय दवाखाना

Views: 159
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सकारात्मक ऊर्जा यशाच्या दिशेला घेऊन जाईल – डॉ सयाजीराजे मोकाशीकॉलेज कॉर्नर इन्स्टिट्यूटचा निरोप समारंभ संपन्न

सकारात्मक ऊर्जा यशाच्या दिशेला घेऊन जाईल - डॉ सयाजीराजे मोकाशी
कॉलेज कॉर्नर इन्स्टिट्यूटचा निरोप समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)