प्राथमिक आरोग्य केंद्र बिळुर येथील वैद्यकीय अधिकारी लाचलुचपच्या जाळ्यात
प्राथमिक आरोग्य केंद्र बिळुर येथील डॉक्टर प्रमोद कांबळे लाच लचपच्या जाळ्यात अडकले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की रुग्णाच्या उपचारा च्या दरम्याने 500 रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी डॉक्टर प्रमोद कांबळे यांना लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले.
दिनांक 29 /7/ 2022 रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये डॉक्टर कांबळे यांनी तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्याकडून उपचारासाठी 700 रुपये तक्रारदार यांच्या मित्राचा मुलगा यांच्यावर उपचार करण्यासाठी 300 रुपये असे एकूण 1000 रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर लागलीच प्राथमिक आरोग्य केंद्र बिळुर तालुका जत जिल्हा सांगली येथे सापळा रचला असता लोकसेवक डॉक्टर प्रमोद कांबळे वैद्यकीय अधिकारी यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नी तसेच तक्रारदार यांचे मित्राचा मुलगा यांच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून दोन्ही मिळून 1000 रुपये स्वीकारले असताना लाच लुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले.
त्या अनुषंगाने डॉक्टर प्रमोद कांबळे वय 46 व्यवसाय वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बिळुर तालुका जत जिल्हा सांगली राहणार शिवाजी पेठ जत, तालुका जत जिल्हा सांगली यांच्या विरोधात जत पोलीस स्टेशन येथे लाच रुचफत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुजय घाडगे, पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार, अविनाश सागर, धनंजय खाडे प्रीतम चौगुले संजय संकपाळ, भास्कर मोरे, संजय कलगुटे, अजित पाटील, सलीम मकानदार, रवींद्र धुमाळ, चालक बाळासाहेब पवार यांनी कारवाई केली.
तसेच भविष्यामध्ये कोणी लाचेची मागणी केली असता संबंधित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा यासाठी 0233/ 23 73 0 95 व्हाट्सअप नंबर 78 75 333333 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे







