नेलकरंजीतील मीना जावीर यांचा खूनच
नेलकरंजी ता. आटपाडी येथील मीना जावीर हिचा बिअर मध्ये लिहोशीन औषध पाजून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

मीना जावीर ह्या नेलकरंजी गावच्या रहिवाशी असून त्याना मार्केटिंग करण्याचा छंद होता. त्या अनेक दिवसापासून शुकमणी कंपनीमध्ये काम करत होत्या, शुकमणी कंपनीचे कार्यालय तासगाव मध्ये असून यामध्ये राजेंद्र बबन पांढरे गोटेवाडी ता.तासगाव हे कंपनीचे प्रमुख होते तर, हर्षदा शिवाजी लांडगे रा. साठेनगर आटपाडी, योजना दत्तात्रय पाटील धांडोरमळा आटपाडी व मीना जविर हे एकत्र काम करत होते .
वरील चारही जण शुकमणी कंपनीमध्ये प्रमुख म्हणून काम करीत होते. यामध्ये मीना जावीर ह्या अनेक वेळा कार्यक्रमांमध्ये हर्षदा लांडगे व योजना पाटील यांना घालून पाडून बोलत होत्या. तर मीना जावीर यांनी राजेंद्र पांढरे यांच्याकडे सतत पैशाची मागणी करीत होत्या. तसेच स्वतःची बदनामी होईल या उद्देशाने वरील तिघा आरोपींनी तासगाव येथील कार्यालयामध्ये मीना जावीर यांना संपवण्याचा डाव आखला होता. मीना जावीर यांना आटपाडी तील राहत्या घरी हर्षदा लांडगे व योजना पाटील यांनी बिअर मधून लिहोसीन औषधे दिले असता तिचा त्यामध्ये मृत्यू झाला.
मीना जावीर यांचा मृत्यू झाला याची खात्री झाल्यानंतर त्या दोघी तिथून निघून गेल्या होत्या
मीना जावीर ह्या 27 जून रोजी मयत झाल्या असून त्या खुनाचा उलगडा आता झाला आहे. याबाबत पोलीस नाईक दादासो ठोंबरे यांनी फिर्याद दिली तर पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.







