• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

खानापूर – आटपाडी की जनता करे पुकार !जयंतराव , हमे चाहिए तुम्हारी सरकार !—– सादिक खाटीक .

माणगंगा by माणगंगा
August 13, 2022
in सांगली
0
खानापूर – आटपाडी की जनता करे पुकार !जयंतराव , हमे चाहिए तुम्हारी सरकार !—– सादिक खाटीक .

खानापूर – आटपाडी की जनता करे पुकार !
जयंतराव , हमे चाहिए तुम्हारी सरकार !

सादिक खाटीक यांनी व्यक्त केली जनभावना .

__

वाळवा – शिराळ्या बरोबरच जयंतराव पाटील यांनी खानापूर – आटपाडी तालुक्यांवर विशेष लक्ष द्यावे अशीच अपेक्षा मतदारसंघातल्या हजारोंची असून
खानापूर – आटपाडी की जनता करे पुकार !
जयंतराव , हमे चाहिए तुम्हारी सरकार ! असाच सर्वत्र नारा दिला जात असल्याचे मत सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .


दि .१४ ऑगस्ट रोजी, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक पुतळा ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यातील करगणीच्या दौर्‍यावर येत असलेले राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी या जनभावना बोलून दाखविल्या .


जयंतराव पाटील साहेबांच्या घराण्याचा आणि खानापूर – आटपाडी तालुक्याचा सुमारे ७५ वर्षापासून मोठा घनिष्ट संबंध आहे . १९५२ – ५३ साली ऐन तारुण्यात सांगली सातारा या एकत्रित जिल्ह्याच्या सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष बनलेल्या राजारामबापू पाटील यांनी खानापूर – कडेगाव सह आटपाडी तालुक्याच्या एकसंघ असलेल्या खानापूर तालुक्यातील आटपाडीच्या रस्तुमरावबापू सेनासुभे चव्हाण – देशमुख यांना आपल्या समवेत लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष बनवून दुष्काळी तालुक्यांविषयी आणि विशेषतः खानापूर आटपाडी विषयी विशेष आस्था प्रकट केली होती .
औध संस्थान काळातल्या आमदारकी, नामदारकी नंतरचा स्वातंत्रोत्तर काळातला आटपाडीचा पहिला मोठा बहुमान आदरणीय राजारामबापूंमुळेच झाला .

बापूंनी लोकल बोर्डाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर आणि विशेषतः दुष्काळी तालुक्यांमध्ये गावोगांव प्राथमिक शाळा सुरु केल्या . पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनीक विहीरी, बारव , आड , पाणवठे, शेतीच्या पाण्यासाठी पाझर तलाव, गाव तलाव , मोठे तलाव साकारण्यात तसेच आरोग्य व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यात राजारामबापू यशस्वी झाले . उपाध्यक्ष पदाबरोबर शिक्षण खात्याची जबाबदारी मिळालेल्या रस्तुमरावबापूंची त्यांना मोलाची साथ लाभली

. त्यानंतरच्या काळातही बापूंनी दुष्काळी तालुक्यांसाठी मोठे काम केले , औद्योगीक वसाहती, विविध उद्योग, साखर कारखानदारी , गावोगावी विजेची व्यवस्था साकारताना त्यांनी दुष्काळी भागाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला . सांगोला तालुक्यातल्या चिंध्यापीर ला चाललेला आटपाडी तालुका वाशीयांचा आत्मीयतेचा माणगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी जवळच्या सोनारसिध्द येथे साकारण्यात राजारामबापूंची, मुख्यमंत्री महोदयां जवळची शिष्टाईच यशस्वी झाली .

आटपाडी जवळचा २५० एम.सी.एफ.टी.चा मोठा तलाव, आटपाडीतल्या बापूंच्या नावच्या राजारामबापू हायस्कूलची निर्मिती केवळ अन् केवळ राजारामबापूं मुळेच झाली . शेकडो ज्येष्टां बरोबर हजारो तरुणांना सर्वच क्षेत्रात राजारामबापूच दीपस्तंभ ठरले .


१९७९ साली जनता पक्षाचे तिकीटावर विजयी झालेले राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते नेलकरंजीचे मोहनराव भोसले यांना निवडून आणण्यात करगणी, गोमेवाडी, हिवतड, परिसराचा मोठा हात होता . धनगर समाजाचे पहिले सभापती झालेले धुळा मारुती झिंबल यांच्यासह शेटफळेचे बाबुराव गायकवाड, करगणीचे काशीनाथ दबडे, आटपाडीच्या दीपा पंचविशे यांना सभापती करण्यात राजारामबापूंचे अनुयायी उपसभापती मोहनराव भोसलेच कारणीभूत ठरले होते .


आदरणीय बापूंच्या नंतर राजकारणात आलेले जयंतराव पाटील साहेबांनी गत ३७ वर्षात देशाला दिपवणारे मोठे काम राज्यभर केले आहे . टेंभू, म्हैशाळ, ताकारी सारख्या असंख्य पाणी योजनांसाठी जयंतराव साहेबच मसिहा बनले . राज्यातल्या दुष्काळी तालुक्यांचे भगिरथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयंतराव साहेबांनी आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख यांच्या पहिल्या स्मृती दिनी म्हणजे ३० मे १९८७ रोजी आटपाडीतल्या साहित्य संमेलनाचे निमित्ताने आटपाडी तालुक्यात पहिले पाऊल ठेवले . गत ३७ वर्षाच्या अथक भ्रमंतीतून सर्वच उपेक्षित, मागास, दुष्काळी तालुक्यांना , तेथील फाटक्या लोकांना मोठा आधार देण्याची भूमिका इमानदारीने त्यांनी निभावली आहे .


सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यांना कृष्णेचे पाणी मिळावे म्हणून सर्वप्रथमः लोकनेते राजारामबापू पाटील यांनी आवाज उठवला, संघर्ष केला . जिल्ह्यातल्या सर्व दुष्काळी तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जयंतराव पाटील यांनीच निर्णायक पावले टाकली असून जिल्ह्यातील एक ही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा निर्धार करून त्यांनी मंत्री पदाच्या काळात प्रचंड निधीसह पावले टाकली आहेत . दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी ताकारी, म्हैशाळ, टेंभू आणि आरफळ या योजनातून जिल्ह्यातील बराचसा भाग ओलीताखाली येत होता. मात्र आटपाडी, कवठेमहंकाळ, जत, खानापूर , तासगांव सह माण , खटाव तालुक्यातील ११९ गावे कृष्णेच्या पाण्यापासून वंचित होती . त्या सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जयंतराव पाटील यांच्यामुळेच मार्गी लागला . हे सर्वश्रुत आहे . खानापूर – आटपाडी तालुक्यातील शेकडो प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम जयंतराव पाटील यांनी केल्याचे सर्व जिल्हा जाणतो .


विसापूर सर्कल मधील राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आणि खानापूर – आटपाडी तालुक्यातील काँग्रेस आय एकसंघपणे महाविकास आघाडीच्या पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी एकवटण्यासाठी जयंतराव पाटील यांनी , आमदार सुमनताई पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांना या मतदार संघात सक्रिय केल्यास या मतदार संघाचा आमदार राष्ट्रवादीचाच होईल आणि हे फक्त जयंतराव पाटील साहेबांच्या रणनितीतूनच घडू शकते . खानापूर आटपाडी मतदार संघातल्या हजारोंना जयंतराव पाटील साहेबांच्या कणखर नेतृत्वाच्या साथीची आवश्यकता आहे . हेच वारंवार स्पष्ट होत असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .

Views: 152
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
खरसुंडी सिद्धनाथाचा राज्यात गाजावाजा, पण सुविधांचा वाजलाय बाज्या,आम. गोपीचंद पडळकर

खरसुंडी सिद्धनाथाचा राज्यात गाजावाजा, पण सुविधांचा वाजलाय बाज्या,
आम. गोपीचंद पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)