खरसुंडी सिद्धनाथाचा राज्यात गाजावाजा, पण सुविधांचा वाजलाय बाज्या,
आम. गोपीचंद पडळकर
खरसुंडी ता. आटपाडी येथील राज्यात प्रसिद्ध असलेले सिद्धनाथाचे मंदिर या सिद्धनाथाचा राज्यभर गाजावाजा आहे. परंतु येथे सुविधाचा बाजा वाजलेला आहे. देवस्थान समितीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी देवस्थान समितीने भक्तांची गैरसोय करू नये भक्तांना सोयी सुविधा पुरवाव्यात अन्यथा समितीच्या कारभाराकडे लक्ष द्यावे लागेल असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
राज्यातून व राज्याच्या बाहेरून अनेक भाविक भक्त सिद्धनाथाच्या दर्शनासाठी येत असतात, त्यामध्ये महिलांचाही समावेश असतो, परंतु या भाविक भक्तासाठी कुठेही स्वच्छतागृहाची सोय नाही, पिण्याचे शुद्ध पाणी नाही, देवस्थानकडे भरपूर जागा आहे
परंतु त्या जागेवरती अतिक्रमण झालेले आहे, वाहनांना पार्किंगची सोय नाही .त्यामुळे दर महिन्याच्या पौर्णिमेला व रविवारी वाहने कशीही वाकडेतिकडे लावल्याने सर्व रस्ते बंद होत असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.
तसेच देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृहाची कुठे सोय नाही. त्यामुळे महिलांना व भाविक भक्तांना याचा त्रास होत आहे.
तरी देवस्थान समितीने स्वच्छतागृह व पार्किंगची सोय करावी अन्यथा देवस्थान समितीच्या कारभारामध्ये मला स्वतः लक्ष द्यावे लागेल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खरसुंडी येथील सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी दिला.
सिद्धनाथाचा परिसर सुधारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. पण समितीने आपला कारभार सुधारावा असे आमदार गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.







