मराठवाडा पुन्हा एकदा पोरका :स्वाती मोराळे.
आज पहाटे पुणे वरून मुंबईकडे जात असताना मुबंई पुणे एक्सप्रेस हायवे वर खोपोली नजीक मराठवाड्यातील शिवसंग्रामचे नेते व संस्थापक विनायकजी मेटे यांचे अपघाती निधन झाले.
मराठा आरक्षणाचा लढा उभारून तो मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे व आरक्षणाच्याच मिटिंगला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख व गोपीनाथजी मुंढे या दिग्गज नेत्यांना मराठवाड्याने अगोदरच आकलनीय गमावले असताना पुन्हा एकदा विनायकरावजी मेटे यांच्यासारखा तरुण तडफदार नेता मराठवाड्याने गमावला आहे.आशा दिग्गज नेत्याला गमावल्याने मराठवाडा पुन्हा एकदा पोरका झाला आहे.
मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज यांचा समुद्रातील पुतळा आणि स्मारक, मराठवाडा नदीजोड प्रकल्प, शेतकरी यांचा लढा देत होते.मुंढे साहेबांच्या बरोबर काम करत असताना भाजपाशी मैत्री करुन मुंढे साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत अग्रेसर होते. आज मुंबई येथे मराठा आरक्षण समितीची मुख्यमंत्री यांच्यासोबत बारा वाजता मिटिंग होती
त्यासाठी रात्रभर प्रवास करुन ते मुंबईच्या दिशेने निघाले असता खोपोली नजीक त्यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिली. त्यावेळी त्यांना डोक्याला व छातीत जोराचा मार बसला होता. यावेळी त्यांना एक तास मदत मिळू शकली नाही त्यादरम्यान त्यांचे अपघाती निधन झाले. उद्या राजुरा ता.केज, जि. बीड येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. मराठवाडा व बिडच्या या तरुण नेत्याला मराठवाडा पुन्हा पोरका झाला आहे.







