पारेकरवाडीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन
पारेकरवाडी ता.आटपाडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त सेंद्रिय शेतीचे आयोजन केले होते या वेळेला कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच मका पिक क्राॅपसॅप शेतीशाळा, जमीन आरोग्य सुधारणा, रासायनिक खते, तणनाशके अतिवापरामुळे जमीन व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच सुवर्णा तरसे, माजी सरपंच नारायण हांडे, गणपत हांडे, व्हाईस चेअरमन अर्जुन करडे, कृषी सेवा केंद्र चालक सत्यवान बरकडे, कृषी पर्यवेक्षक कमलेश घोडके, बी टी एम प्रशांत पाटील व कृषी सहायक, संजय काळेल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. व मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा केला.
तसेच मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण करण्यासाठी सुरूवातीच्या स्टेजला कसे नियंत्रण करावे याचे प्रात्यक्षिक 5% निंबोळी अर्क फवारणी करून शेतकऱ्यांना दाखविले.
तसेच उपविभागीय कृषी अधिकारी विटा सागर खटकाळे तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील मंडल कृषी अधिकारी सुनिल लोखंड,यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला*







