देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली .
यानिमित्त गुरुकूल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आटपाडी या निवासी शाळेत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .
या संमेलनामध्ये प्रा . सुनील दबडे, सुधाकर इनामदार , प्रा.डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा. संताजी देशमुख, शाहीर हरीभाऊ गळवे या कवींनी सहभाग घेतला होता . कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी सुधाकर इनामदार होते . पोवाडा व देशभक्तीपर कविता , गितांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती वृद्धींगत व्हायला मदत झाली . विविध विषयांवरील कवितावाचन व कविता गायनामुळे तब्बल दोन तास विद्यार्थी कविसंमेलनात रंगून गेले होते .
गुरुकूलचे प्राचार्य साळुंखे यांच्याहस्ते सर्व कविंचा सत्कार करण्यात आला . विविध क्षेत्रांत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सर्व कविंच्या हस्ते पेन व वही देवून सन्मान करण्यात आला . अशा संमेलनांमुळे विद्यार्थ्यांचे , तरुणांचे मनोबल उंचावून व्यक्तीमत्व सुधारायला मदत होते असे मत यावेळी गुरुकुलच्या शिक्षक , प्राध्यापकांनी व्यक्त केले .







